प्रतिनिधी//
:-राष्ट्रीय किसान मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी मार्फत आमदार घेराव आंदोलनाचा इशारा निवेदनातून देण्यात आला . आमदार हे शेतकऱ्यांच्या मतांवर निवडून विधानसभेत जातात . परंतू शेतकऱ्यांच्या समस्या विधानसभेत मांडण्यासाठी तोंड उघडत नाही . अशा आमदारांना१० जूनला घेराव आंदोलनाचा इशारा निवेदनातून देण्यात आला . या निवेदनात शेतकऱ्यांच्या विविध मागण्या आहेत . शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळाला पाहिजे . शेतकऱ्यांचे थकित विजबिल माफ करावे . शेतीसाठी २४ तास विज पुरवठा करावे . सोलर ऊर्जेची सक्ती करू नये . पिक विमा कंपण्यापासून शेतकऱ्यांचे शोषण थांबवावे . अतिवृष्टी , वन्यजीव जंगली प्राणी यापासून शेतकऱ्यांच्या शेतमालांची नुकसान भरपाई करावे . प्रधानमंत्री पिकविमा योजना रद्द करून इर्मा कायदा लागू करावे . अशा विविध मागण्या पूर्ण करण्यासाठी आमदार कुठलेही प्रयत्न करत नाही . म्हणून शेतकरी मोठ्या प्रमाणात कर्जबाजारी होऊन आत्महत्या करतात . या मागण्या पूर्ण करण्यासाठी आमदार घेराव आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला .
निवेदन देतेवेळी राष्ट्रीय किसान मोर्चा चे जिल्हाप्रभारी प्रमोद राऊत , भोजराज कान्हेकर बामसेफ जिल्हाध्यक्ष , राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेचे जिल्हाध्यक्ष ज्योती आत्राम, बहुजन मुक्ती पार्टीचे सचिव नरेंद्र शेंडे , शांतीलाल लाडे उपाध्यक्ष बहुजन मुक्ती पार्टी , दामोधर शेंडे सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.