प्रतिनिधी,//
आरमोरी,. उन्हाळ्याच्या दिवसात पशु -पक्ष्यांना त्यांची स्वतःची तहान भागविण्यासाठी पाण्याची गरज भासत असते आणि ते पशु -पक्षी गावात धाव घेत असतात, याचं विचार करता आम्ही सर्व युवा मित्रांनी पशु-पक्ष्यांसाठी छोटंसं प्रयत्न करीत एक छोटसं उपक्रम हाती घेतला, सालमारा आणि आरमोरी रोड च्या जंगलात चारा-पाण्यासाठी तेलाच्या टिनेला आकार देऊन त्यात मधोमधे पाणी आणि चार बाजूला तांदूळ,गहू,धान ई चारा ठेऊन झाडांवरती बांधला जंगलात असतांना पक्षांची किलबिल ऐकून खुप छान वाटलं की आपण हाती घेतलेले उपक्रम पक्षांना खुप महत्वाचं ठरेल, तसचं आपण सगळ्यांनी एकत्र येऊ असे उपक्रम राबविले पाहिजे अन् हे करतांना आपलं कर्तव्य म्हणून करा, यातच आपली माणुसकी जागी आहे हे दिसून येईल ! हे जे कठीण काळ आहे हे बाकी काहीच नसून निसर्गावर आपण अगोदर केलेल्या कर्माचे फळ देत आहे तरी या गोष्टी मधून एकच संदेश द्यायचा आहे तो म्हणजे सगळ्यांनी घरासमोर “पशु- पक्ष्यांसाठी पाणी ठेवा’ समोर येऊन ते आपली तहान भागवतील या साठी आपण सुद्धा एक छोटसं प्रयत्न केला पाहिजे हीच नम्र विनंती.
यशस्वितेसाठी रुचित बोधनकर,नितीन बरडे,नाना कामतकर,रोहित बनकर,ओम आकरे, शुभम बोधनकर, क्षितिज हर्षे, निखिल लांजेवार, राकेश बोधनकर,सानू मेहेरे आदी मित्रपरिवार उपस्थित होते.👍🏻🙏🏻