राजाराम येथील दलीत वस्तीतील वीज समस्या सुटणार- संदीप कोरेत शिवसेना नेता दलित वस्तीत लवकरच मंजूर डीपी चे काम सुरु होणार

123

अहेरी:- नुकताच अहेरी येथे शिवसेना कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला होता. सदर कार्यक्रमात राजाराम गावातील दलित वस्तीतील पिढीत लोकांनी संदीप भाऊ कोरेत शिवसेना युवा नेता अहेरी विधानसभा यांच्याकडे त्याच्या वार्ड क्रं 3 ची विद्युत समस्या दूर करण्यास लेखी स्वरूपात निवेदनातून मांडले तेव्हा संदीप भाऊ नि त्यांना त्यांची समस्या लवकरात लवकर सोडविण्याचे आश्वासन दिले होते
काल दिनांक १२ मे रोजी त्यांनी प्रत्यक्ष राजाराम गावातील प्रभाग क्रमांक-३ मध्ये भेट देऊन त्यांच्या समस्येची पाहणी करून समस्याग्रस्त प्रभागातील विद्युत समस्या वर चर्चा केले आणि समोरील कारवाई हेतू लगेच जिमलगठ्ठा येथील महावितरण कंपनीच्या कार्यालयात अधिकाऱ्यांशी मंजुर डीपी लावण्यास इतकी दिरगाई का बरं यावर विस्तृत चर्चा केली.
चर्चेदरम्यान उपस्थित अधिकाऱ्याने या दोन ते तीन दिवसांत दिवसात कामाला सुरुवात होईल असे आश्वासन दिले त्यामुळे लवकरच राजाराम गावातील वार्ड क्रं 3 येतील दलीत वस्तीतील कमी दाबाच्या विज समस्या हि कायमची सुटणार आहे.
त्यामुळे गावातील समस्या ग्रस्त लोकांनी संदीप भाऊ चे आभार मानले