सामाजिक कार्यकर्ते अमोल कुळमेथे यांची आदिवासी टायगर सेना, गडचिरोली जिल्हाध्यक्ष पदी निवड

41

गडचिरोली :- आदिवासी टायगर सेना, महाराष्ट्र राज्य, गडचिरोली जिल्हाअध्यक्ष पदी युवा, तडफदार सामाजिक कार्यकर्ते अमोल कुळमेथे यांची नुकतीच नियुक्ती झाली. सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळख असलेल्या अमोल कुळमेथे ह्यांची नियुक्तीती केळापूर-आर्णी विधानसभेचे आमदार तथा कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य आदीवासी टायगर सेना राजुभाऊ तोडसाम, विदर्भ अध्यक्ष एड.संतोषभाऊ कुळमेथे, विदर्भ अध्यक्षा डॉ. सोनलताई कोवे , नीता तलांडी ह्यांनी केली आहे.
आदिवासी टायगर सेना ही समाजाच्या सर्वांगीण प्रगती, अस्मिता, आत्मसन्मान, शिक्षण, संस्कृती संवर्धन व संरक्षणासाठी एका वैचारिक कॅडर बेस संघटना असून अमोल कुळमेथे हे गडचिरोली येथील सामाजिक कार्यकर्ते असून आरोग्य, शिक्षण, आदिवासी समाजाच्या समस्यांना वाचा फोडताना ते नेहमी दिसतात.
सर्वधर्म समभाव हा मंत्र बाळगुन सर्व समाज हिताच्या कार्यात तत्पर असतात अशी त्यांची ओळख आहे.
लवकरच इतर पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करून, जिल्ह्यात संघटना मजबुत करत, तळागाळातील लोकांच्या समस्या ऐकून ते दूर करण्याचा प्रयत्न संघटनेच्या माध्यमातून करनार असा मत त्यांनी नियुक्ती दरम्यान व्यक्त केले आहे.
अमोल कुळमेथे यांच्या निवडीने सर्वत्र आनंदाचे वातावरण पसरले असून सर्व स्तरावरून शुभेच्यांचा वर्षाव होत आहे…