माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी दिले शब्द केले पूर्ण. जाफ्राबाद येथील पाण्याची समस्या होणार दूर.

173

प्रतिनिधी//
सिरोंचा : तालुक्यातील ग्रामपंचायत जाफ्राबाद वार्ड नंबर दोन येथील काँग्रेसनेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा आहेती बाजार समितीचे संचालक अजय कंकडालवार यांच्या स्वखर्चाने बोरवेल मारून दिले.या बोरवेलची उदघाटन स्थानिक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा हस्ते पार पडला.

सिरोंचा,जाफ्राबाद दौरा दरम्यान अजय कंकडालवार यांनी जाफ्राबाद येथे आल्यावेळी वार्ड नंबर दोन येथील पाण्याची सुविधा नसल्याने वोर्डातील नागरिक पिण्याची पाणीसाठी अडचण भासत असल्याची माहिती येथील काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तसेच नागरिक कंकडालवारांना सांगितले होते.त्यावेळी कंकडालवारांनी लवकरत लवकर आपल्या गावातील पाण्याची समस्यासह आदी समस्यांची सोडवण्यात येणार अशी ग्वी दिले.

दिलेले शब्द पार पडत आज जाफ्राबाद वार्ड नंबर दोन येथे माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या स्वखर्चाने बोरवेल मारून दिले आहे.हा बोरवेल पडल्याने आता वार्डतील नागरिकांना पाणीची समस्या धूर होऊन सोय सुविधा उपलब्ध होणार आहे.त्यावेळी नागरिकांनी अजय कंकडालवार यांची आभार वेक्त केली.

या बोरवेलची उदघाटन प्रसंगी जाफ्राबाद ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच तिरुपती दुर्गम,ग्रामपंचायत सदस्य महेंद्र दुर्गम,विजय दुर्गम,राजशेखर मूडमाडीगेला,सुमन दुर्गम,तिरुपती डोंगरे,तिरुपती मूडमाडीगेला, रवीन डोंगरे,सिद्धार्थ डोंगरेसह गावातील स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.