प्रतिनिधी//
*नागपूर:-* भाजपा प्रदेश कार्यकारी अध्यक्ष श्री.रवींद्रजी चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपाच्या संघटन पर्व अभियानांतर्गत वस्ती संपर्क अभियानाच्या अनुषंगाने पूर्व विदर्भ विभागीय आढावा बैठक आज रजवाडा पॅलेस नागपूर येथे संपन्न झाली.
महाराष्ट्रवासियांच्या हितासाठी आदरणीय मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखालील सरकारतर्फे विविध उपक्रम, योजना आणि शासकीय निर्णय घेतले जात आहेत. सरकारची ही कामगिरी आपल्या भागातील जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करण्याच्या दृष्टीने कार्य करण्याचे आवाहन भाजपा प्रदेश कार्याध्यक्ष मा.आ.श्री रवींद्र चव्हाण साहेब यांनी केले.
या विभागीय बैठकीमध्ये पूर्व विदर्भ विभागातील सर्व आजी माजी आमदार, खासदार , जिल्हाध्यक्ष, विविध आघाड्यांचे पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.