प्रतिनिधी//
अहेरी : तालुक्यातील ताटीगुडम येथील मैलेश भगवान सिडाम यांचे घराला काल दुपारी 1 वाजता अचानकपणे आग लागल्याने आगीत आवश्यक कागदपत्रे,कपडे,खाण्यापिण्याचे सामान तसेच घरातील महागडे वस्तू जाळून खाक झाले.घराला आग लागल्याचे गावात कळताच गावकऱ्यांनी धाव घेत आगीवर नियंत्रण आणले.यात शिडाम कुटुंबाचे खूप नुकसान झाले.
या घटनेची माहिती येथील स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आविसं,काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्रचे समन्वयक व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समितीचे संचालक अजयभाऊ कंकडालवार यांना दूरध्वनी द्वारे सांगितले होते.त्यावेळी कंकडालवारांनी तहसीलदार साहेबांना सांगून लवकरात लवकर पंचनामा करून सिडाम कुटूंबाला शासना कडून मदत मिळवून द्यायला सांगितले.
विशेष म्हणजे त्या दिवशी अजय कडालवार काही कामानिमित्त बाहेर असल्यामुळे काँग्रेसचे नेत्या व अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती सुरेखा आलम व आविसं,काँग्रेस पदाधिकारी,कार्यकर्त्यांना सांगून सिडाम परिवाराला अत्यावश्यक घरचा सामान खरेदीसाठी कंकडालवार कडून आर्थिक मदत देण्यात आली.
यावेळी विलास सिडाम,इंदू पेंदाम, लक्ष्मण कोडापे, वासुदेव सिडाम,गंगाराम मडावी,सीताराम गावडेसह स्थानिक आविसं,काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच सिडाम परिवारातील सदस्य उपस्थित होते.