एटापल्ली : पाणी टाकीवरच्या मधमाश्या कडे स्थानीक प्रशासनाचे दूर लक्ष?

57

27 जणांना मधमाशांचा चावा
एटापल्ली : उत्तम मानसिक दृष्ट्या हतबल होता. एटापल्ली शहरातील विविध हॉटेलामध्ये पाणी भरून, तर कधी जाणे येणे करणाऱ्यांना पाच दहा रुपये मागून आपले पोट भरत होता. तो कोणत्या गावाचा होता. त्याचे कोणी नातेवाईक आहेत का. याची कुणालाही कल्पना नाही. नातेवाईकांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला का हे पण कुणाला माहित नाही. दोन दिवसाआधी तो मरण पावला. उत्तम बंगाली भाषिक होता. त्याला हिंदी मराठी बोलता येत नव्हती. स्थानिक बंगाली नागरिक त्याच्याशी संवाद साधून त्याची खबरबात घ्यायचे. दोन दिवसाआधी तो मरण पावला असला तरी त्याच्या मृत्यूच्या कारणाबाबत गौड बंगाल आहे. मधमाशांचा चावा घेतल्याने त्याचा मृत्यू झाला असं काहींचे म्हणणे आहे. शासकीय पातळीवर मात्र याची नोंद झालेली नाही. पंचायत समिती एटापल्ली च्या आवारात असलेल्या पाण्याच्या टाकीला मधमाशांचे पोळ लटकलेले आहेत. मधमाशांच्या पोळांना पक्षांनी दिवसले असे सांगण्यात येत आहे. दिवसल्याने मधमाशा बिथरल्या. जाणाऱ्या येणाऱ्यांना चावल्या. यात उत्तम चा सुद्धा समावेश होता. त्याला ग्रामीण रुग्णालय एटापल्ली येथे दाखल करण्यात आले. यातच त्याचा मृत्यू झाला. श्रीनाथ बैरागी यांनी त्याला दवाखान्यात दाखल केले त्यांच्या मतानुसार उत्तम ला मधमाशा चावल्या होत्या. डॉक्टर रुपेश उईके यांच्या मतानुसार उत्तम चा रक्तदाब कमी झाला होता आणि त्याला मधुमेहाचा पण त्रास होता. यात त्याचा मृत्यू झाला. उत्तम चा मृत्यू बाबत विविध कारणे सांगितली जात असली तरी मधमाशांनी जावा घेतल्याच्या कारणाची मोठी चर्चा होत आहे. सोबतच 27 जणांना सुद्धा मधमाश्यांनी चावा घेतला आहे. उत्तम ची मानसिक स्थिती खराब होती. तो कधीकधी शिव्या दिल्यासारखे सुद्धा बोलायचा. मानसिक स्थिती खराब असल्याने त्याचे बोलणे कुणी मनावर घेतले नाही. उत्तम मरण पावला. मधमाशांनी 27 जणांना जखमी केले. मधमाशांनी जनतेवर हल्ला केला. याची मात्र शासकीय पातळीवर कोणीही दखल घेतली नाही. प्राथमिक दृष्ट्या ही जबाबदारी वनविभागाची आहे. या घटनेची वनविभागाला पुसटशी कल्पना सुद्धा नाही. एकूणच 27 जणांना मधमाशा चावतात ते उपचार घेतात. काही व्यक्ती काही वेळ दवाखान्यात दाखल असतात. मात्र हा सगळा प्रकार वनविभागाच्या लक्षात येत नाही साधी चौकशीही केली जात नाही. या अनुषंगाने जनतेकडे कोण लक्ष देणार ही समस्या उभी ठाकली आहे.
गेल्या अनेक वर्षापासून पंचायत समिती परिसरातील पाण्याच्या टाकीला मधमाशांचे पोळ चिपकलेले आहेत. निसर्गाचे अधिवासात मधमाशांचे पोळ चिपकणे ही सामान्य बाब आहे. यावर काही उपाय नाही मधमाशा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणावर स्थलांतरित होतात. हे मान्य आहे. पण मधमाशा बिथरतात आणि जनतेचा चावा जर घेत असतील तर याकडे वनविभागाचे लक्ष असणे आवश्यक आहे. मधमाशी पालन करणे पोळांमधून मध गोळा करणे याचे प्रशिक्षण वनविभाग देते. संयुक्त वनव्यवस्थापन समिती अंतर्गत एटापल्ली येथे काही दिवसापूर्वी मदविक्री सुद्धा करण्यात येत होती. हा प्रकल्प बारगळला. आता बंद आहे.
प्रकल्प सुरू असताना मधमाशांच्या पोळांमधून मजा संकलन करण्याचे काम जोमात सुरू होते. प्रकल्प बंद झाल्याने मधमाशांचे पोळ जिथे-तिथे चिपकून असल्याचे दिसून येत आहे पण याच्याकडे स्थानिक प्रशासनाचे दूर लक्ष आहे हे मात्र नक्की