वनविभाग एटापल्ली येथे माजी. पंचायत समिती सदस्य हर्षवर्धन बाबा आत्राम यांनी वन हक्क दाव्येदारांचे विषयी बाबत भेट..!!

209

एटापल्ली:-तालुक्यातील वनविभाग कार्यालयात आज दुपारचा सुमारास आदिवासी बांधवांच्या सोबत वन विभाग अधिकारी व कर्मचारीशी माजी.पंचायत समिती सदस्य हर्षवर्धन बाबा आत्राम यांनी चर्चा केले. व वन हक्क पट्टांसाठी ज्या ज्या कागद पात्रांची आवश्यक आहे त्यांना लवकरात लवकर देण्यात यावी असे आवाहन दिले.
सदर त्यावेळी वनविभागाच्या मॅडम खोब्रागडे यांनी आमचा विभागा कडून काहीही अडचण येत नाही साहेब असे त्या वेळी सांगितले. व सदर जो बांधव आदिवासी असला पाहिजे इतर कोणत्या ही गैर आदिवासी बांधवांना आम्ही कागद पत्र लिहून देणार नाही असे त्या वेळी सांगितले.

सदर त्यावेळी वनविभागाच्या अधिकारी, एटापल्ली तालुकाध्यक्ष सांबा हिचामी, अहेरी तालुकाध्यक्ष नागेश मडावी, विधानसभा अध्यक्ष लक्ष्मण येर्रावर, माजी.जि.परिषद सदस्य संजय चारडूके,राजू नरोटे लक्ष्मण नरोटे, अजय पदा, सूरज जाधव, तिरुपती मडावी, सुनील नैताम, आकाश राऊतसह एटापल्ली तालुक्यातील कार्यकर्ते व गावकरी बांधव उपस्थित होते