केंद्रीय राखीव पोलीस बल व सीआरपीएफ १९१बटालियन मार्फत शिविल एक्शन कार्यक्रम संपन्न

39

दिनांक 27/03/2025
191 बटालियन केंद्रीय राखीव पोलीस बल (CRPF) मार्फत शिविल ऍक्शन कार्यक्रम 27 मार्च 2025 रोजी सी/191 बटालियन केंद्रीय पोलीस दलाच्या वतीने गाव हेडरी, तहसील-एटापल्ली, जिल्हा गडचिरोली (महाराष्ट्र) येथे श्री सत्यप्रकाश कमांडंट 191 केंद्रीय राखीव पोलीस बल यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री सत्यप्रकाश कमांडंट 191 बटालियन, श्री चैतन कदम SDPO. एटापल्ली, श्री संतोष डरंगे (असिस्टंट कमा.) C/191 बटालियन केंद्रीय राखीव पोलीस बल, डॉ. अनाथू आणि पोलीस उपनिरीक्षक सुनील दौंड, पोलीस उपनिरीक्षक बराटे, पोलीस उपनिरीक्षक पदम सिंग दुलत, पोलीस निरीक्षक संजय अनंतराव सिंदे (रा. रा. पो. बल ), आणि सी. आर. पी. एफ.चे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात आदरणीय बिरसा मुंडा आणि बाबुराम शेडमाके यांच्या पूजनाने झाली. त्यानंतर विनोबा भावे यांच्या शाळेतील मुलांनी रेला नृत्य सादर केले.
या कार्यक्रमात 191 बटालियन केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या वतीने येडस गोंडी, अलूर, आलेंगा, पुसुमपल्ली, नेंडेर, बोडमेट्टा, रेकनार आदी गावातील ग्रामस्थांसह 350 ग्रामस्थांना सौर दिवे, सायकल, व्हॉलीबॉल, कॅरम बोर्ड, फुटबॉल, क्रिकेट, स्प्रे पंप आदींचे वाटप करण्यात आले.