दिनांक 26 मार्च 2025 रोजी डी/191 वी वाहिनी, केंद्रीय राखीव पोलिस बल गर्देवाडा त एटापल्ली जिल्हा गडचिरोली येथे श्री सत्यप्रकाश, कमांडेन्ट 191 वी वाहिनी यांच्या मार्गदर्शनाखाली शिवीक ऍक्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री राजीव रंजन कुमार सिंह, द्वितीय कमान अधिकारी, 191 वी वाहिनी केंद्रीय राखीव पोलीस बल, निरी/जिडी काकडे ए. डि, डी/191 वी वाहिनी, तसेच श्री धनाजी शिंदे पोलीस उप निरीक्षक पोलीस मदत केंद्र गर्देवाडा, श्रीमती पुष्पा आलाम (आरोग्य सेवक गर्देवाडा), श्रीमती कुंदा पुष्पारामकर (आरोग्य परिचारिका गर्देवाडा) व केंद्रीय पोलीस बल (CRPF) चे अन्य समस्त अधिकारी व जवान कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित होते.
शिवीक ऍक्शन कार्यक्रमा अंतर्गत डि/191 वी वाहिनी केंद्रीय राखीव पोलीस बल गर्देवाडा द्वारा गर्देवाडा परिसरातील अतिदुर्गम गर्देवाडा, पुसकोटी, हाचबोडी, मर्दकुही, रेकलमेट, रेंगाटोला, नैताला, कोईनवर्षा 450 ग्रामवासियांना मोठे गंज, कढई, गॅस शेगडी, सोल्लर लाईट, कॅरम बोर्ड, वाल्लीबा, फुटबॉल, क्रिकेट किट, प्लास्टिक खुर्ची, तसेच ब्लॅंकेट, इत्यादी जीवनावश्यक /करमणूकीच्या वास्तूचे वाटप केले, श्रीमती पुष्पा आलाम( आरोग्य सेवक गर्देवाडा) श्रीमती कुंदा परशुरामकर ( आरोग्य परिचारिका गर्देवाडा) टीम द्वारे पन आरोग्य शिबिरा मार्फत ग्रामवासियांची आरोग्य तपासणी केली. व भारत सरकार मार्फत राबविल्या जातं असलेल्या विविध उपक्रमाबद्दल माहिती दिली. या कार्यक्रमाप्रसंगी गर्देवाडा प्राथमिक शाळेच्या विदयार्थांनी मनमोहक कार्यक्रमाचे आयोजन केले, व पाहुण्यांचे लक्ष वेधले.
शिवीक ऍक्शन कार्यक्रमाचे प्रमुख पाहूणे श्री राजीव रंजन कुमार सिहं द्वितीय कमान अधिकारी 191 वी वाहिनी यांनी ग्रामवासियांना संबोधीत करताना या कार्यक्रमाचा एकमात्र उद्देश वामपंथी उग्रवादग्रस्थ भागातील युवक युवतीच्या आकांक्षा वाढविणे, आदिवासी युवक युवतीना विकासाची संधी देने, औद्योगिक प्रगती आणी भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाची माहिती देने आहे. तसेच या कार्यक्रमद्वारे पोलीस आणी जनता यांच्यामध्ये सोहार्दपूर्ण भावनिक नाते विकसित करण्याचा प्रयत्न केला जातो असे सांगितले.
शिवीक ऍक्शन कार्यक्रमाच्या समापमी निरीक्षक/जिडी जितेंद्र कुमार डी/191 वी वाहिनी केंद्रीय राखीव पोलीस बल (CRPF) तसेच उपस्थित पत्रकार, आरोग्य सेवा व समस्त ग्रामवासियांना कार्यक्रमांची शोभा वाढविल्याबद्दल आभार व्यक्त केले