ग्रामीण रुग्णालय मुलचेरा चालतोय वाऱ्यावर डॉक्टर लोकांना आणि कर्मचाऱ्यांना वेळेचे बंधन नाही

292

मुख्य संपादक तथा संचालक//सुरेश मोतकुरवार
#indindastak#onlienewsportal#social#education#politcal#entertainment#crime

मूलचेरा :- ग्रामीण रुग्णालय मुलचेरा येथील दवाखान्यात डॉक्टरांची मनमानी सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे.

डॉक्टरांची रुग्णालयात येण्याची निर्धारित वेळ साडेदहा वाजता असून डॉक्टर रुग्णालयात वेळेवर उपस्थित राहत नाही.

डॉक्टर आपल्या मन मानिनुसर 12:30 च्या सुमारास कॅबिनमध्ये दस्तक देतात उन्हाळा सुरू झालेला असुन या गर्दी मद्ये रुग्णांची दुर्दशा होत आहे.
ग्रामीण रुग्णालयात चिमुकले बालक म्हातारे आजारी रुग्ण उपचाराकरिता तालुक्यात ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी येतात जवळपास 25 ते 26 गावातील रुग्ण उपचारा करीता मुलचेरा ला येतात.
रुग्ण जवळपास दहा ते पंधरा किलोमीटर अंतरावरून प्रवास करून येतात आणि डॉक्टरचा पत्ताच गायब.
ग्रामीण रुग्णालय मुलचेराचे अधीक्षक साहेबांना विनंती आहे की निष्काळजी वेळे नुसार येणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई करण्यात यावी आणि वेळेवर येण्याचे आदेश द्यावे.
जेणेकरून रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना त्रास होऊ नये त्या डॉक्टरांची विलंबने वाट पहावं लागू नये असे रुग्णांनी सांगितले