बोलेपल्ली येथे शहिदविर बाबुराव फुल्लेश्वर शेडमाके, यांच्या पुतळ्याचे तथा सल्ला घागरा चे अनावरण

149

मुख्य संपादक तथा संचालक//सुरेश मोतकुरवार
#indindastak#onlienewsportal#social#education#politcal#entertainment#crime

मुलचेरा: 11 मार्च बोलेपल्ली येथे वीर शहीद बाबुराव फुल्लेश्वर शेडमाके यांच्या पुतळ्याचे तसेच सल्ला घागरा पुतळ्याचे अनावरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडले. या ऐतिहासिक कार्यक्रमात उद्घाटक म्हणून माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री आत्राम(हलगेकर) यांनी
वीर शहीद बाबुराव शेडमाके यांच्या जीवनावर प्रकाश टाकताना त्यांचे क्रांतिकारी कार्य आदिवासी समाजासाठी अत्यंत प्रेरणादायक असल्याचे सांगितले.
*भाग्यश्री ताई म्हणाल्या, “वीर बाबुराव शेडमाके यांचे संपूर्ण जीवन इंग्रजी राजवटीविरोधातील संघर्ष आणि आदिवासी समाजाच्या अधिकारांसाठी समर्पित होते*
*त्यांचा बलिदान आजही आपल्या ह्रदयात गजर करत राहील. त्यांच्या कर्तृत्वाने आदिवासी समाजाला स्वाभिमान आणि संघर्षाची शिकवण दिली.” त्यांच्या शब्दात, शहीद बाबुराव शेडमाके यांच्या कार्याने केवळ आदिवासी समाजाला नव्हे, तर संपूर्ण राष्ट्राला क्रांतिकारी प्रेरणा मिळते*
*या कार्यक्रमाला माजी आमदार डॉ. देवराव होळी, कोवे महाराज, नरेश कांदो, मनोहर तिम्मा, सुरेश मट्टामी, मस्तरी झुरे, रमेश तिम्मा, फकिरा दुर्वा, मारोती पल्लो, विशाल कोडापे, दिलीप चलाख, जयराम चलाख, सुरेश शहा, मंगेश कुळयेटी, बुधाराम कोडापे, मनोहर हलामी, सुरेश मट्टामी, ज्ञानेश्वर कुणघाडकर, प्रतीक राठी, श्रीनिवास विरगोनवार, श्रीनिवास चठारे नगर सेवक, अनुराग बेझलवार, विमला गावडे, स्वप्नील श्रीरामवार, धनंजय मंथनवार, सुमित मोतकुरवार आणि इतर ग्रामस्थ उपस्थित होते*
*कार्यक्रमाच्या सुरुवातीला शहीद बाबुराव शेडमाके यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. त्यानंतर सल्ला घागरा यांचे अनावरण करण्यात आले, जे एक ऐतिहासिक व सांस्कृतिक दृष्टीकोनातून महत्त्वपूर्ण ठरते*
*कार्यक्रमाचे आयोजन जय महादाखंडी ग्रामसभेने केले होते, ज्याने या शहीदाच्या कर्तृत्वाला सन्मान देण्याचा महत्त्वपूर्ण उपक्रम राबवला. उपस्थित सर्व ग्रामस्थांनी कार्यक्रमाचे आयोजन केलेल्या समितीचे आभार मानले.