अहेरी येथे नगर सेवक अमोल मुक्कावार यांचे आमरण उपोषण • अहेरी नगरातील सामान्य जनतेचा ज्वलंत समस्या

117

मुख्य संपादक तथा संचालक//सुरेश मोतकुरवार
#indindastak#onlienewsportal#social#education#politcal#entertainment#crime

– अहेरी: अहेरी येथील स्व. विश्वेश्वराव महाराज चौकात असलेल्या स्टेज वर नगर सेवक अमोल मुक्कावार यांनी अहेरी नगरातील सामान्य जनतेचा ज्वलंत समस्या करिता आमरण उपोषणाला सुरुवात केली.
अहेरी शहरात विविध समस्या अनेक कालावधी पासून प्रलंबित असून पुर्ण झाले नाही. त्यात
अहेरी मुख्यचौक ते प्राणहिता पर्यंतचे रस्त्याचे काम तात्काळ सुरु करून पूर्ण करण्यात यावे तसेच अहेरी मुख्य चौक ते गडअहेरी पर्यंत चे काम सुरु करून तात्काळ पूर्ण करण्यात यावे.

अहेरी उपजिल्हा रुग्णालयात M.D. अस्थिरोग तज्ञ व M.D. मेडीसीन डाक्टरची तात्काळ नेमणूक करावी.

नगर पंचायत क्षेत्रातील वनहक्क जमीन धारकांना ठराव देवून प्रकरण पुढे पाठवावे.

अहेरी नगरातील bsnl tower, प्राणहिता पोलीस कॅम्प / प्रभूसादन, इंदिरानगर कॉलनी (बेघर) गडअहेरी, गडबाम्हणी, व चेरपल्ली येथे तात्काळ नवीन पाणी टाकी मंजूर करून पाणी पुरवठा करन्यात यावा.

घरकुल धारकाप्रमाणे घाटलिलाव होई पर्यंत इमारत बांधकाम करणाऱ्या लोकांना 10 ब्रास रेती मोफत उपलब्ध करून देण्यात यावे.

संजय गांधी व श्रावण बाळ योजनातील लाभार्थ्यांना महिन्याच्या 1 तारखेला अनुदान बँक खातेत जमा करणायत यावे.

अहेरी उपजिल्हा रुग्णालयात दिव्यांग बांधवाना प्रमाणपत्र मिळण्याची सोय करून देण्यात यावी. अश्या विविध समस्या घेऊन उपोषण केली जात आहे.
यावेळी नगर सेवक अमोल मुक्कावार, सुमित मोतकुरवार,राहुल दुर्गे, आमोल रामटेके व प्रभाकर कुसराम आदी उपस्थित होते.