युवा प्रशिक्षणार्थ्यांचा रोजगार हिरावू नये आमदार डॉ.धर्मराव बाबा आत्राम यांना निवेदन : अहेरी तालुका येथील मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी संघटनेची मागणी

212

मुख्य संपादक तथा संचालक//सुरेश मोतकुरवार
#indindastak#onlienewsportal#social#education#politcal#entertainment#crime

अहेरी: मुख्यमंत्री युवा कार्य
प्रशिक्षणार्थ्यांना कार्यरत विभागातच कायम करावे, अशी मागणी अहेरी तालुका मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी संघटनेच्या वतीने मा.आमदार डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांचे मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदनातून करण्यात आली.

प्रशिक्षण काळात युवकांना विद्यावेतन मिळत असल्याने तात्पुरता रोजगार सुद्धा मिळालेला आहे. प्रशिक्षणादरम्यान शासकीय कामकाजाच्या विविध बाबींचे सखोल मार्गदर्शन मिळत आहे. या योजनेच्या माध्यमातून शासनाची कार्यप्रणाली जवळून समजून घेण्याची संधी मिळाली आहे.
सदर प्रशिक्षणानंतर रोजगार उपलब्ध होत नसेल तर प्रशिक्षणाचा फायदा काय? प्रशिक्षणानंतर रोजगार
द्यायचे नव्हते तर प्रशिक्षण दिले कशाला, असे प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे.

प्रशिक्षणानंतर कौशल्य असून सुद्धा बेरोजगार होण्याची वेळ आली आहे. त्यांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण होऊ नये.यासाठी त्यांना त्याच विभागात

कायम करावे, अशी मागणी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी संघटनेचे अहेरी तालुकाध्यक्ष श्री.सचिन येरोजवार, सूरज मडावी, प्रियंका सिडाम, आरती गेडाम, प्रवीना सुनतकर,समीर मडावी,विनोद गाडगे,रमादेवी तोटावार,पूजा गौडेवार,लता बतकु,विवेकानंद मंडल,योना दुर्गे,पायल दुर्गे, आरती मडावी,आशिष सडमेक आदींनी केली.