गडचिरोली जिल्ह्यात काल झालेल्या वादळी पावसामुळे एटापल्ली आलापल्ली आष्टी मार्गावर शांतीग्राम लगाम गावाजवळ काल रात्रो 3-4 तास वाहतूक ठप्प झाली होती. सुरजागड लोह प्रकल्पातून लोह वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे रस्त्यावर नेहमी मोठमोठ्या वाहनांची वळदळ असते या वाहनांमुळे मागील वर्षापासून गडचिरोली जिल्ह्यात अपघातांचे प्रमाणही वाढले आहेत.
काल 3-4 तास वाहतूक ठप्प असुनही सुरजागड कंपनीने वाहतूक सुरळीत करण्यासाठी कोणतीही दखल घेतली नाही. वाहतूक ठप्प झाल्यामुळे चंद्रपूर ते अहेरी, भामरागड, एटापल्ली जाणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसेस सुध्दा यात अडकल्या होत्या. सुरजागड लोह प्रकल्प झाल्यापासून या मार्गावरील लोकांना अशा अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. या समस्येकडे वाहतूक
प्रशासनाचे, पोलिस प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. या कारणास्तव या मार्गावरील लोकांनी संताप व्यक्त केला आहे. लोह वाहतूक करणाऱ्या वाहनांवर प्रशासनाचे नियंत्रण ठेवून सामान्य नागरिकांना होणारा त्रास कमी कराव अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते क्रिष्णा वाघाडे यांनी केली आहे.