मुख्य संपादक तथा संचालक//सुरेश मोतकुरवार
#indindastak#onlienewsportal#social#education#politcal#entertainment#crime
दिनांक- 02/01/2025
पथसंचलनात पोलीस दलाच्या विविध शाखांसह शालेय विद्याथ्र्यांचा सहभाग
दिनांक 02 जानेवारी महाराष्ट्र पोलीस स्थापना दिन असून दिनांक 02 जानेवारी ते 08 जानेवारी पर्यंत रेझिंग डे सप्ताह साजरा केला जातो. या कालावधीत पोलीस दलाकडुन विविध उपक्रम राबविले जातात. या निमित्ताने आज दिनांक 02/01/2025 सकाळी 10 वा. गडचिरोली जिल्ह्राचे पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांच्या उपस्थितीत गडचिरोली पोलीस दलाचे पथसंचलन पार पडले.
दिनांक 02 जानेवारी पासून जिल्ह्रातील सर्व पोस्टे/उपपोस्टे/पोकमें मध्ये रेझींग डे साजरा करण्यात येणार आहे. गडचिरोली पोलीस दलाकडुन प्रत्येक शाळेमध्ये शस्त्र प्रदर्शन, गडचिरोली पोलीस दलाविषयी माहिती, सायबर गुन्हे, महिला सुरक्षा या विषयीचे फलक दर्शवून लोकांमध्ये जनजागृती तसेच स्वच्छता अभियान, रस्ता सुरक्षा रॅली व व्यसनमुक्ती संकल्प रॅलीचे आयोजन करण्यात येणार आहेत.
त्याचाच एक भाग म्हणून आज गडचिरोली शहरातील कारगील चौकापासुन पथसंचलन सुरु होऊन इंदिरा गांधी चौक ते बस स्थानक येथुन परत इंदिरा गंाधी चौक येथे येवून पथसंचलनाची सांगता करण्यात आली. सदर पथसंचलनात पोलीस दलातील विविध शाखांनी सहभाग घेऊन महिला सुरक्षा, सायबर जनजागृती, वाहतुक नियम या विषयीचे फलक दर्शवून लोकांमध्ये जनजागृती केली. पथसंचलनामध्ये ध्वजवाहक, पोलीस मुख्यालय महिला प्लाटून, विशेष अभियान पथकाचे प्लाटुन, बँड पथक, शालेय विद्यार्थी, बुलेट प्लाटुन, टु व्हिलर वाहन प्लाटुन, श्वान पथक, बीडीडीएस पथक व एमपीव्ही वाहन यांनी शिस्तबद्ध पथसंचलन केले. या पथसंचलनामध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय गडचिरोली, पोलीस स्टेशन गडचिरोली, पोलीस मुख्यालय, मोटार परिवहन विभाग, विशेष अभियान पथक, सिव्हीक अॅक्शन, प्रोपागंडा, श्वान पथक, बीडीडीएस, सीटीसी, सायबर सेल, भरोसा सेल इ. शाखेतील अधिकारी व अंमलदार तसेच शासकीय इंग्रजी माध्यमीक आश्रम शाळा, गडचिरोली, सरस्वती विद्यालय, महिला महाविद्याल तसेच पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणार्थी असे एकुण 250 विद्यार्थी- विद्यार्थींनीनी आपला सहभाग नोंदविला.
सदर पथसंचलनामध्ये गडचिरोली जिल्ह्राचे पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. एम. रमेश उपविभागीय पोलीस अधिकारी, गडचिरोली श्री. सुरज जगताप, प्रभारी अधिकारी, पोस्टे गडचिरोली श्री. रेवचंद सिंगनजुडे व राखीव पोलीस निरिक्षक, गडचिरोली श्री. अनुजकुमार वसंतराव मडामे व विविध शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.