राजाराम उप पोलीस स्टेशन येथे भव्य जनजागरण व रेला नृत्य मेळावा संपन्न

117

मुख्य संपादक तथा संचालक//सुरेश मोतकुरवार
#indindastak#onlienewsportal#social#education#politcal#entertainment#crime

        राजाराम: दि. 15/12/2024 रोजी गडचिरोली जिल्हा पोलीस दलाचे वतीने पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून मा.श्री. निलोत्पल सा. पोलीस अधीक्षक गडचिरोली ,मा. श्री. एम रमेश सा.(अपर पो.अधीक्षक  प्रशासन) ,मा.श्री.यतीश देशमुख सा . ( अप्पर पो.अधीक्षक अभियान) गडचिरोली, मा. श्री. लोढा सा. अपर पोलीस अधीक्षक (प्राणहीता ) अहेरी, यांच्या संकल्पनेतून व मा.श्री. अजय कोकाटे सा.उपविभागीय पोलिस अधिकारी प्राणहिता अहेरी , यांचे मार्गदर्शनाखाली उप पोस्टे राजाराम खां येथे “*भव्य जनजागरण व रेला नृत्य मेळाव्याचे*”  आयोजन करण्यात आले.
     सदर भव्य जनजागरण व रेला नृत्य मेळाव्याचे अध्यक्ष पोउपनी आकाश जाधव साहेब प्रभारी अधिकारी उप पोस्टे राजाराम खां तर कार्यक्रमांचे प्रमुख पाहुणे म्हणून मा. डॉ . राजेश मानकर प्रा. आ. केंद्र राजाराम,मा.भाष्कर तलांडे (माजी सभापती प. स. अहेरी,मा.रोशन कंबगोणीवार उप सरपंच राजाराम ,मा.अनिल पेन्दाम सामाजिक कार्यकर्ते गुड्डीगुडम, मा. संतोष गनपूरवार शिक्षक गुड्डीगुडम, मा. सत्यम भंडारवार (पो.पाठील) रायगट्टा , मा. दामा गावडे (पो.पा) मरनेली ,मा.सुरेश दहागावकर (पो.पा) नंदिगाव ,मा. सुरेश मोतकुरवार (पत्रकार.राजाराम).तसेच जिल्हा पोलिस अधि./अंम. SRPF अधि./अंम. व हद्दीतील 150 ते 200 नागरिक उपस्थित होते. 
               सदर भव्य जनजागरण व रेला नृत्य मेळाव्याची सुरुवात क्रांतीवीर शहीद भगवान बिरसा मुंडा,यांच्या प्रतिमेस पाहूण्यांचे हस्ते दीप प्रज्वलन व पुष्पहार अर्पण करून भव्य जनजागरण व रेला नृत्य मेळाव्याची सुरुवात करण्यात आली.       
सदर भव्य जनजागरण व रेला नृत्य मेळाव्याचे प्रमूख पाहूणे डॉ .राजेश मानकर प्रा. आ. केंद्र राजाराम यांनी उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन केले. तसेच अध्यक्ष प्रभारी अधिकारी श्री.आकाश जाधव सा. यांनी मार्गदर्शन केले.
  *   सदर भव्य जनजागरण व रेला नृत्य मेळाव्याला रेला नृत्या करीता 6 संघानी उपस्थित दर्शवली व त्यात जय सेवा रेला कला नृत्य गुड्डीगुडम यानी प्रथम क्रमांक पटकावीला तर दुतिय क्रमांक गोल्लाकर्जी तसेच तृतिय क्रमांक राजाराम इंग्लिश मिडीयम स्कूल येथिल विध्यार्थीनी पटकविला तसेच मेळाव्यात विद्यार्थी, विद्यार्थिनी, शेतकरी व नागरिकांना खालील उपयोगी साहित्य वाटप  करण्यात आले.
1) ब्लॅंकेट – 27

        सदर भव्य जनजागरण व रेला नृत्य मेळाव्यात उपस्थित सर्वाना जेवण ची व्यवस्था करण्यात आली.
       सदर मेळाव्याचे सूत्र संचालन पोलीस हवालदार विठ्ठल तेलंगे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी उप पोस्टे राजाराम खां येथील जिल्हा पोलीसचे  सर्व अधिकारी , अंमलदार, तसेच एसआरपीएफचे अधिकारी अमलदार व spo यांनी मोलाचे सहकार्य केले .
सदर मेळावा 10.00 वा. सुरू करून 14.30 वा. यसस्वीरित्या कोणताही अनुचित प्रकार घडू न देता पार पाडण्यात आला.