मुख्य संपादक तथा संचालक//सुरेश मोतकुरवार
#indindastak#onlienewsportal#social#education#politcal#entertainment#crime
सिरोंचा : तालुक्यातील आसरअल्ली पोलिस ठाणे हद्दीतील रंगधामपेठा गावात एका अल्पवयीन मुलीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी (दि.7) रात्रीच्या सुमारास उघडकीस आली. साक्षी वेंकटराव कालवा (15) असे मृत मुलीचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, शुक्रवारी रात्री घरातील सर्व मंडळी झोपल्यानंतर साक्षी घराबाहेर पडली. दरम्यान रात्री 10 वाजताच्या सुमारास घरालगतच असलेल्या झाडाला गळफास लावलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह आढळून आला. तत्काळ याची माहिती आसरअल्ली पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठत पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. आसरअल्ली पोलिस ठाण्यात प्रकरणाची नोंद करण्यात आली. पुढील तपास आसरअल्ली पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी समाधान दौड करीत आहेत. अल्पवयीन मुलीच्या आत्महत्येचे कारण कळू शकले नाही.