एटापल्ली येथे संत जगनाडे महाराज जयंती झेंडा वंदन करून मोठ्या उस्तहात साजरी करण्यात आली

244

मुख्य संपादक तथा संचालक//सुरेश मोतकुरवार
#indindastak#onlienewsportal#social#education#politcal#entertainment#crime

*प्रतिनिधी: तेजेश गुज्जलवार*

आज दिनांक 08/12/2024 रोजी मौजा एटापल्ली येथे संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांची 400 वी जयंती मोठ्या उत्साहात घ्वजारोहण करुन व संताजी जगनाडे महाराज यांच्या पुतळ्याचे पुजन करुन साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री. जितेंद्रजी टिकले नगरसेवक नगर पंचायत एटापल्ली यांचे अध्यक्षतेखाली घेण्यात आली. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री. अंबादासजी वैरागडे (सेवानिवृत्त मुख्याध्यापक चंदनवेली), श्री. किशोर मल्लेवार (मुक्तोपथ तालुका संघटक एटापल्ली), श्री. भालचंद्र टिकले, श्री. राजेंद्र वैरागडे, श्री. जितेंद्र चिचघरे, श्री. नरेंद्र वासेकर, श्री. चेतन चापले, श्री. विश्वनाथ भांडेकर, हे होते कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री अंबादासजी वैरागडे यांनी समाजातील सर्व बांधवांनी आपल्या मुलांना चांगल उच्च्च शिक्षण देऊन संस्कारी बनवावे असे सांगितले तर श्री. किशोर मल्लेबार यांनी समाजबांधवांनी दारु सारख्या महारोगी व्यसनापासुन दूर राहुन आपल्या कुटूंबाचे व मुलांचे भविष्य घडवावे असे सांगितले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रो. जितेंद्रजी टिकले नगरसेवक नगर पंचायत एटापल्ली यांनी समाजातील सर्व बांधवांनी राजकारणात व प्रशासनात जाऊन समाज बांधवांची सेवा करावी असे मार्गदर्शन केले.

तसेच कार्यक्रमाचे यशस्वीतेकरीता श्रो. सुरेश वैरागडे, नुरज नैताम, देविदास सुरजागडे, जिवन वैरागडे, नितीन सुरजागडे, रविंद्र सुरजागडे, किशोर नैताम, समिर चापडे, जालिमनाध वासेकर, अशोक नैताम, एकनाथ नैताम, ज्ञानेश्वर नैताम, आशिष भूरसे, यांनी अथक परिश्रम घेतले कार्यक्रमाचे संचालन श्री घनश्याम नेताम यांनी केले तर मान्यवरांचे आभार चेतन चापडे, यांनी मानले.