भारतीय कम्युनिष्ठ पार्टीच्या कॉ सचिन मोतकुरवार यांचा गट्टा ३३/११ उपकेंद्राचा फिडर वेगळा करण्याचा मागणीला यश

116

मुख्य संपादक तथा संचालक//सुरेश मोतकुरवार
#indindastak#onlienewsportal#social#education#politcal#entertainment#crime

प्रतिनिधी: तेजेश गुज्जलवार

भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे जांभीया गावातून दोडुरं फीडर वेगळा करण्यात आला आहे. त्यामुळे आता वीजेची समस्या उद्भवली तर ती फक्त त्या भागातच होईल, आणि दुसऱ्या भागांवर त्याचा परिणाम होणार नाही. तसेच वारंवार होणारे ब्रेकडाऊनही आता थांबतील, ज्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

भारतीय कम्युनिस्ट पक्षाने गेल्या काही महिन्यांपासून ही मागणी सातत्याने केली होती. जिल्हाधिकारी, कार्यकारी अभियंता, तसेच खासदारांच्या आढावा बैठकीत कॉ. सचिन मोतकुरवार यांनी हा मुद्दा ठामपणे मांडला होता. त्यानंतर मा. नामदेव किरसाण साहेबांनी उपकार्यकारी अभियंता, एटापल्ली यांना त्वरित कार्यवाहीचे आदेश दिले. त्यानुसार, दोडुरं फीडर वेगळा करण्याचे काम सुरू झाले आणि आता ते यशस्वीपणे पूर्ण झाले आहे.

आता फक्त गर्देवाडा फीडर वेगळा करायचे काम शिल्लक आहे, जे येत्या काही दिवसांत पूर्ण होईल, असे सांगण्यात आले आहे. या महत्त्वपूर्ण कामासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कॉ सचिन यांच्या कामाची स्तुती होत आहे….