वनमहोत्सव सप्ताह चित्रकला स्पर्धेत संस्कार पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची उत्कृष्ट कामगिरी

235

मुख्य संपादक तथा संचालक//सुरेश मोतकुरवार
#indindastak#onlienewsportal#social#education#politcal#entertainment#crime

प्रतिनिधी: तेजेश गूज्जलवार

वनमहोत्सव सप्ताहाच्या निमित्ताने फॉरेस्ट डिपार्टमेंट द्वारा आयोजित चित्रकला स्पर्धेत संस्कार पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी आपली कला प्रतिभा दाखवत प्रथम, द्वितीय, आणि तृतीय क्रमांक पटकावले आहेत. या स्पर्धेचे आयोजन पर्यावरणाच्या जतनासाठी जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने करण्यात आले होते.

स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवणारा विद्यार्थी भाविक कुणघाडकर यांनी वन्यजीव संरक्षणाच्या विषयावर अप्रतिम कलाकृती सादर केली. त्यांच्या चित्रात वन्यजीवांचा सजीव आणि सुंदर संदेश मांडण्यात आला होता.

द्वितीय क्रमांक मिळवणारी विद्यार्थिनी समीक्षा मंडल यांनी पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन कसे करावे, यावर जोर देणारे चित्र काढले, ज्याने परीक्षकांचे लक्ष वेधून घेतले.

तृतीय क्रमांक मिळवणारा विद्यार्थी पूर्वी आईंचवार यांनी वृक्षारोपण आणि वनराई वाढविण्याच्या गरजेवर आधारित चित्र साकारले होते. यावेळी उपस्थित एटापल्ली चे उपजिल्हाधिकारी नमन गोयल साहेब, शैलेश मीना साहेब उपवनसंरक्षक भामरागड वनविभाग, रामटेके साहेब सहायक वनसंरक्षक, एन के खोब्रागडे मॅडम वनपरिक्षेत्र अधिकारी एटापल्ली यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरव करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन सुजाता रच्चावार यांनी केले.

स्पर्धेतील विद्यार्थ्यांची कला, सर्जनशीलता आणि जागरूकता पाहून संस्थेचे अध्यक्ष विजय संस्कार, मुख्याध्यापिका पूजा दासरवार यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. संस्कार पब्लिक स्कूल चे विध्यार्थी परिसरात वेगवेगळ्या उपक्रमात व स्पर्धेत नेहमी अव्वल राहतात हे विशेष. मागील वर्षी माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमात प्रथम आलेली होती.