मुख्य संपादक तथा संचालक//सुरेश मोतकुरवार
#indindastak#onlienewsportal#social#education#politcal#entertainment#crime
*◆अहेरी◆:* *गडचिरोली जिल्ह्याचा अहेरी उपविभाग हे तेलंगाणा राज्याला लागून असून या क्षेत्रातील लोकांचा जास्त संबंध तेलंगाणा राज्याशी असल्याने या अहेरी उपविभागात शारदीय नवरात्रीत बतकम्मा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो.
आलापल्ली येथील वेलगुर रोडवरील बतकम्मा उत्सव खूप प्रसिद्ध असून तेथील बतकम्मा उत्सव कमेटीच्या विनंतीला मान देऊन आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष तथा माजी आमदार दिपकदादा आत्राम सह माजी जिल्हा परिषद सदस्या सौ अनिताताई दिपकदादा आत्राम उपस्थित राहून विधिवत पूजा करून बतकम्मा उत्सव सुरू करून दिले.त्या नंतर महिलांचा आग्रहास्तव सौ अनिताताई दिपकदादा आत्राम यांनी उत्सवात सहभाग घेऊन महिलांचा आनंद द्विगुणित केले.
या बतकम्मा उत्सव च्या पूजेच्या वेळी आलापल्ली येथील वेलगुर रोड वरील भाविक सह आविस चे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.