*आलापल्ली:-* येथील मन्नेपवार कॉलनीत राष्ट्रवादी काँगेस पक्षाचे कार्यकर्त्यांची बैठक बुधवार 4 सप्टेंबर रोजी राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री ना. धर्मराव बाबा आत्राम साहेब यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आले.
यावेळी आलापल्ली ग्राम पंचायतीचे सरपंच शंकर मेश्राम, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बबलु भैय्या हकीम, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रवींद्र वासेकर, सिनेट सदस्या तनुश्रीताई आत्राम , माजी पंचायत समिती सदस्य हर्षवर्धनराव बाबा आत्राम, रा.काँ.चे अहेरी विधानसभाध्यक्ष लक्ष्मण येरावार, रा.काँचे महिला तालुकाध्यक्ष सारिका गडपल्लीवार, आलापल्ली ग्राम पंचायतीचे उपसरपंच पुष्पाताई अलोणे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी प्रामुख्याने आलापल्ली शहरातील आदिवासी, गैरआदिवासीना वनजमिनीचे पट्टे संदर्भात , मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, लखपती कन्या योजना, आलापल्ली ग्राम पंचायत अंतर्गत विविध विकासात्मक कामे, मन्नेपवार समाजासाठी समाज मंदिर आदी व अन्य लोकाभिमुख आणि लोककल्याणकारी योजने विषयी सविस्तर माहिती सांगून मोलाचे मार्गदर्शन केले.
यावेळी सरपंच शंकर मेश्राम, सुरेंद्र अलोणे यांनीही आपले विचार व्यक्त केले.
बैठकीचे औचित्य साधून अनेक महिला , युवती, सामाजिक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार) गटात प्रवेश केले असून त्यांचे मंत्री ना. धर्मराव बाबा आत्राम यांनी पक्षाचे दुप्पटे गळ्यात टाकून स्वागत केले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. संचालन आनंद अलोणे यांनी केले तर उपस्थितांचे आभार कैलास कोरेत यांनी मानले.