*तात्काळ गरजु लाभार्थ्यांना अनुदान देण्यात यावे अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष दिलीप घोडाम व देसाईगंज युवक काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष विजय पिलेवान यांच्या नेतृत्वात लाभार्थ्यांचा मुख्याधिकारी नगरपरिषद देसाईगंज यांना इशारा*
आरमोरी – देसाईगंज शहरातील हद्दीतील झोपडपट्टी वासीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील व्यक्ती, अल्प उत्पन्न गटातील व्यक्ती, भूमिहीन गोरगरीब गरजु लाभार्थ्यांसाठी प्रधानमंत्री शहरी आवास योजना जवळपास आठशे नऊ लाभार्थ्यांना मजूर करण्यात आल्याने लाभार्थ्यांनी आपले कुडामातीचे घरे पाडुन लवकरात लवकर करण्यासाठी काही किरायाने व काही पाल बाधुन आपल्या घराचे बाधकाम सुरु केले. यात केंद्र सरकार 1 लाख 50 हजार तर राज्य सरकार 1 लाख असे एकूण अनुदान 2 लाख 50 हजार असुन यातील राज्य सरकारनी आपला सव अनुदान लाभार्थ्यांना दिला
परंतु केंद्र सरकारने पहिले व दुसरा डिपिआर मिळुन 509 लाभार्थ्यांना प्रति लाभार्थी 1लाख 20 हजार अनुदान दिले परंतु अजुनही केंद्र सरकारकडे सेवटचा टप्पा उवरीत 509 लाभार्थ्यांचे प्रति लाभार्थी 30 हजार प्रमाने जवळपास 1 कोटी 52 लाख 70 हजार तसेच तिसरा डिपिआर मध्ये केंद्र सरकारने 300 लाभार्थ्यांना प्रति लाभार्थी 60 हजार अनुदान वितरित केले यातील अजुन प्रति लाभार्थी 90 हजार प्रमाने 2 कोटी 700 हजार असुन एकुण 4 कोटी 22 लाख 70 हजार अनुदान केद्रसरकारकडे प्रलंबित आहेत असल्याने गरजु प्रधानमंत्री शहरी आवास योजनेतील लाभार्थी मंजुर झालेले घर उसने उधार करुण बांधकाम अनुदान मिळेल.
या आशेवर कज घेतले तसेच मटेरियल थोडाफार पैसे देऊन अनुदानाच्या भरोषावर उचले परंतु गेल्या कित्येक महिन्यांपासून अनुदान केंद्र सरकारनी दिला नसल्याने लाभार्थी अडचणीत सापडला आहे यात हात उसने कर्ज देणारे व मटेरियल सप्लायर गरीब लाभार्थ्यांच्या घरी पैसे साठी वारंवार चकरा मारत असल्याने लाभार्थी फार मोठ्या आथिर्क अडचणीत सापडल्याने देसाईगज शहरातील प्रधानमंत्री आवास योजनेचे प्रलंबित अनुदान तात्काळ देण्यात यावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष दिलीप घोडाम व देसाईगंज युवक काँग्रेसचे शहराउपाध्यक्ष विजय पिलेवान यांच्या नेतृत्वात लाभार्थ्यांनी देसाईगंज नगरपरिषद चे मुख्याधिकारी यांना निवेदनातून दिला
आहे.
यावेळी राजु ऊईके मनोहर पारधी भास्कर करकाडे दिपक कवासे हिवराज करकाडे शामराव निकुरे रमेश ठाकरे जयदेव मुळे संजय बेदरे यादव कांबळे गिता ठाकरे वंदना करकाडे कुदा पारधी भागरथा दुधे यांसह अन्य लाभार्थी उपस्थित होते.