नगरपंचायत एटापल्ली नगरपंचायत च्या सांस्कृतिक भवन गोटूल च्या दर निश्चितिच्या जाहीर निषेध #jantechaawaaz#news#portal#

42
प्रतिनिधी//
नगराध्यक्ष सर्व नगरसेवक व मुख्याधिकारी  
     नगरपंचायत एटापल्ली 
नगरपंचायत च्या सांस्कृतिक भवन गोटूल च्या दर निश्चितिच्या जाहीर निषेध
दिनांक १३/०२/२०२३ रोजी झालेल्या नगरपंचायत एटापल्ली सर्वसाधारण सभा ठराव क्र.१०/०५ 
     भारताची जनता या भारत देशाचा सर्व सार्वजनिक संपत्ति ची मालक आहे त्यात आपले नगरपंचायत ही जनतेच्या मालकीची आहे व नगरपंचायत ची सर्व चल अचल संपत्ति ही जनतेच्या मालकीची आहे अंदाजे दोन दशकपूर्वी बनलेले सांस्कृतिक भवन गोटूल हे जनतेद्वारा निवडलेल्या खासदार निधीतून ( भारतातील जनतेच्या पैसा वापरुन बनविले आहे) निर्माण करून जनतेच्या सेवेकरीता उपलब्ध करून देण्यात आले होते. आपल्या भारत देशात देशातील सर्व नागरिक समान आहेत आर्थिक स्थितीवरून देशात असमानता निर्माण होऊ नये सर्वाना समान संधि ,सुविधा व अधिकार मिळवा 
म्हणून शासकीय शाळा , शासकीय रुग्णालय , शासकीय हातपंप व विहिरी ,विविध कार्यक्रम कार्यक्रम सार्वजनिक सभागृह बांधकाम जनतेने निवडलेले जनप्रतिनिधी व लोकसेवक जनतेचा पैसा वापरुन करतात. या सर्व सुविधा श्रीमंत व गरीब यामध्ये फरक न करता सर्वाना मोफत किंवा नाममात्र( अत्यंत स्वस्त दर ) शुल्क घेऊन उपलब्ध असतात.  
दिनांक १३/०२/२०२३ रोजी झालेल्या नगरपंचायत एटापल्ली सर्वसाधारण सभा ठराव क्र.१०/०५ नुसार  नगरपंचायत च्या सांस्कृतिक भवन गोटूल चे जे नवीन दर निश्चित केले ते नगरपंचायत ची ब्रिटिशवादी नोकरशाही-भांडवलशाही भेदभावपूर्ण मानसिकता दर्शविते. या निर्णयाने श्रीमंत- गरीब, नोकरशाहा-सामान्य नागरिक , आदिवासी-गैरआदिवासी अश्या प्रकारचा सामाजिक-आर्थिक भेदभाव समाजात निर्माण करत आहेत हे पूर्णपणे असंविधानिक आहे. तुम्ही लग्नसमारंभ करिता गोटूल सभागृह वापरण्याचे शुल्क १० हजार रु १ दिवसाचे शुल्क ठेवले आहे गरीब व्यक्ति करिता ही खूप मोठी रक्कम आहे लग्नाचा मूळ खर्च तर असतोच त्यांना , वाढदिवस व सांस्कृतिक कार्यक्रमसाठी ५०० रु प्रतीतास एक गरीब व्यति खर्च करण्याचा विचार सुद्धा करू शकत नाही , ५०० रु प्रती तास एक माध्यम वर्ग परिवाराला सुद्धा परवडणार नाही, २५०० रु इतर कार्यकरांसाठी ठेवण्यात आले आहे सामाजिक किंवा राजकीय सेवा कार्य करणारे
 संघटन ला समजुपयोगी कार्य करताना २५०० रु परवडणारे नाही याउलट आदिवासी सांस्कृतिक कार्यक्रम सन आणि शासकीय कार्यक्रम करिता गोटूळ सभागृह  मोफत देण्यात येत आहे . वरील सर्व दर श्रीमंतांना परवडतात , गरीब आणि माध्यम वर्ग ही रक्कम या महागाई चा काळात देणे शक्य नाही याउलट श्रीमंतांनाकडे पैसा असतो ते खाजगी सभागृह ही मोठी रक्कम देऊं बूक करू शकतात .सभागृहाची निर्मिती जनतेच्या पैसा वापरुन गरीब ,माध्यमवर्ग आणि श्रीमंत सर्वाना आपली हक्काची सभागृह विविध प्रकारचे कार्यक्रम घेण्यासाठी मोफत किंवा नाममात्र शुल्क मध्ये सदैव उपलब्ध असावे म्हणून संपूर्ण देशात अश्या प्रकरचे सभागृह विविध नावे व विविध योजनांची नावे देऊन बांधकाम करण्यात आले आहे ,आपले गोटूळ सभागृहही जनतेच्या मालकीचे आहे , 
आपणास मी आठवण करून देऊ इच्छितो की सभागृहाचे बांधकाम व देखबाल दुरूस्तही जनतेच्या पैसा वापरुन झाली आहे जे जनता विविध टॅक्स च्या रूपात केंद्र सरकार ,राज्य सरकार , व इतर शासकीय विभागणना जनता विविध मार्गाने देते, जनतेला कडून पैसा घेणे परंतु आदिवासी समाजाला व शासकीय कामांना मोफत देऊन नोकरशाहा व सामाजिक भेदभाव निर्माण करणाऱ्या  मानसिकतेला खतपाणी देत आहात या नगरपंचायत च्या ब्रिटिशवादी नोकरशाही-भांडवलशाही भेदभावपूर्ण मानसिकतेच्या  भारतीय कम्यूनिस्ट पार्टी तर्फे जाहीर निषेध करतो. 
  भाकपा एटापल्ली 
  कॉ. सचिन मोतकुरवार ता. सचिव 
   कॉ. शरीफ शेख -सहसचिव 
  कॉ. सूरज जककुलवार -AISF