जि.प.उच्च प्राथमिक शाळा, जिबगाव येथेनिरोप तथा सत्कार समारंभ संपन्न

89

चंद्रपूर:जि,प.उच्च प्राथमिक शाळा, जिबगाव येथे इयत्ता 7 वी च्या विद्यार्थ्यांना निरोप तसेच सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभाग घेत उत्साहात निरोप समारंभ व सत्कार समारंभ कार्यक्रम पार पाडण्यात आले त्यावेळी जिबगाव केंद्राचे नवनियुक्त केंद्रप्रमुख श्री. जे.बी.वाढई सर, श्री. राजेंद्र रक्षणवार सर, तसेच सौ. मोनिताई उंदिरवाडे उपसरपंच ग्रा.प.जिबगाव यांचा सत्कार समारंभ उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. गणेश चुदरी अध्यक्ष शा.व्य.समिती, उद्घाटक श्री राकेशभाऊ गोलेपल्लीवार सदस्य ग्रा.प.जिबगाव, सौ.रासिकाताई मेश्राम उपाध्यक्ष शा.व्य.स. , श्री कुंजन गांगरेड्डीवार सदस्य, सौ.प्रेमीलाताई ठाकरे सदस्य, सौ.अर्चनाताई बारसागडे सदस्य, सौ.सुरेखाताई मेश्राम सदस्य, सौ.मनिषाताई चुदरी सदस्य, श्री सुरेश वायकोर उच्च श्रेणी मुख्याध्यापक, श्री. दिपक कुलमेथे सर, श्री.संदेश मानकर सर,श्री नाकतोडे सर, श्री भेले सर यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री मानकर सर व आभार प्रदर्शन श्री कुलमेथे सर यांनी केले.