वीज अपघातातील मृत झालेल्या कुटुंबाला शासनाकडून ४ लाख रुपये धनादेश सुपूर्त #jantechaawaaz#news#portal#

113
प्रतिनिधी//

*महागाव बूज येथील शेत शिवारातील घटना.

अहेरी तालुक्यातील महागाव बु येथील दिनांक 26/7/2023 च्या सकाळी शेतीच्या कामाकरीता गेलेल्या शेतकऱ्यावर वीज पडुन जागीच मृत्यू झाल्याची सकाळी 8.30 ते 9 वाजताच्या दरम्यान घटना घडली होती. लक्ष्मण नानाजी रामटेके वय 54 रा. महागाव असे मृत्यू शेतकऱ्याचे नाव होते. मागील आवड्यापासूनच अहेरी परिसरात ढगाळ हवामान असल्याने पावसाची जोरदार हजेरी लागली होती. 

काही भागात विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यास सुरुवात झाली होती. त्यामुळे शेतकऱ्यांची एकच धांदल उडाली. महागाव बू येथेही पावसाची सुरवात होताच शेतीचे काम करण्यासाठी बांधावर गेले होते. याचवेळी त्यांच्या अंगावर वीज पडून ते जमिनीवर कोसळले. घटनेची माहिती मिळताच गावकरी तसेच कुटुंबीयांनी शेत बांधावर धाव घेतले होते.त्यांच्या पश्चात दोन पत्नी, दोन मुली, जावई व नातू असा आप्त असुन घरचा कर्ता व्यक्तीचा मृत्यू झाल्याने रामटेके परिवारावर डोंगर कोसळले असुन महागाव बू परीसरात हळहळ व्यक्त होत होते. रामटेके यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यात यावे अशी मागणी गावकऱ्यांनी शासनाकडे केली होती.

कुटूंबाचा कर्ता पुरूषाचे वीज पडल्याने निधन झाल्यामुळे कुटूंब विस्कळीत होऊ नये म्हणून शासनाकडून आज दिनांक 29/07/2023 रोजी शासनाकडून अर्थसहाय्य म्हणून ४ लक्ष रू. निधीचे धनादेश नायब तहसिलदार सुरपाम मॅडम व नायब तहसिलदार फारूख,नायब तहसिलदार सय्यद यांच्या हस्ते मृतक स्व. लक्ष्मन नानाजी रामटेके यांच्या पत्नी ताराबाई रामटेके, सुनंदा लक्ष्मन रामटेके तसेच त्यांच्या दोन्ही मुली यांना देण्यात आले.

धनादेश देतांना तलाठी जल्लेवार, आर आय चांदेकर, गावातील जेष्ठ नागरिक श्रिनिवासजी अलोने, रविंद्र मुंजमकर, गिरिष मुंजमकर, माजी उपसरपंच मारोती करमे, उपसरपंच संजय अलोने,कोतवाल शंकर टेकुल,सदस्य दिपाली कांबळे, सदस्य लालू वेलादी, सदस्य विनायक वेलादी, लहानू मुंजमकर, श्रिकांत चालूरकर तसेच गावातील गावकरी बांधव उपस्थित होते. निराधार झालेल्या कुटूंबाला शासनाकडून तात्काळ मदत दिल्याबद्दल *ग्रामपंचायतचे उपसरपंच संजय अलोने* यांनी शासनाचे धन्यवाद मानले.