माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज यांचे कडून मृत महिलेला स्वगावी नेण्यास आर्थिक मदत #jantechaawaaz#news#portal#

97
प्रतिनिधी//
भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम नक्षलग्रस्त गाव नेलगुंडा येथील एका महिलेचा अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालय येथे मृत्यू झाल्याचे सामाजिक कार्यकर्ते विकास तोडसाम यांना माहीती मिळाली. त्यांची अत्यंत हलाखीची परिस्थिती असल्याने शव घेऊन जाण्यासाठी त्यांना आर्थिक मदतीची अत्यंत गरज होती. सदर विषय मा.राजे अम्ब्रिशराव महाराज यांना
 कळताच क्षणाचा विलंब न करता शव स्वगावी नेण्यासाठी चारचाकी वाहनांत ३५०० रु डिजल टाकून वाहन उपलब्ध करून दिली. यावेळी त्यांनी त्यांच्या कुटुंबियांना ५५०० रुपयाची आर्थिक मदतही केली
यावेळी उपस्थित विकास तोडसाम,विनोद जिल्लेवार,पौरी मट्टामी,मोहित नैताम,सारंग रामगीरवार आदी होते.