आयटक-महाराष्ट्र राज्य शालेय पोषण आहार कर्मचारी यूनियन

64

#indiandastak#onlinenewsnetwork#social#political#crime#accident#

प्रतिनिधी//

देशातील सर्वात सर्वात जुने संघटन आयटक स्थापना-१९२० (१०४ वर्षाचे संघटन)
आयटक महाराष्ट्र राज्य शालेय पोषण आहार कर्मचारी युनियनचा सिरोंचा तालुका मेळावा यशस्वीरित्या संपन्न
दिनांक २५ फेब्रुवारी २०२४ रोजी आयटक महाराष्ट्र राज्य शालेय पोषण आहार कर्मचारी युनियनचा सिरोंचा तालुका मेळावा यशस्वीरित्या संपन्न झाला.
या मेळाव्याला कॉ. सचिन मोतकुरवार, जिल्हा संघटक, आयटक यांनी मार्गदर्शन केले. कॉ. किशोर मडावी,ता.अ, कॉ. जुबेदा शेख आणि कॉ. किशोर चंकापुरे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
या मेळाव्यात तालुक्यातील शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांच्या विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली. यामध्ये मानधन वाढ, कामाची सुरक्षितता आणि कायमस्वरूपी नोकरी या प्रमुख मागण्यांचा समावेश होता.
कॉ. सचिन मोतकुरवार यांनी या कर्मचाऱ्यांच्या मागण्यांना पाठिंबा देत सरकारला त्वरित या समस्यांचे निराकरण करण्याचे आवाहन केले. कॉ. किशोर मडावी आणि कॉ. जुबेदा शेख यांनीही या कर्मचाऱ्यांना संघटित होण्याचे आणि आपल्या हक्कांसाठी लढण्याचे आवाहन केले.
कॉ. किशोर चंकापुरे यांनी या मेळाव्याचे आयोजन आणि व्यवस्थापन उत्तमरित्या केल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.
या मेळाव्यास तालुक्यातील मोठ्या संख्येने शालेय पोषण आहार कर्मचारी उपस्थित होते.

आयटक
कॉ.सचिन मोतकुरवार जि.संघटक
दि.२५/०२/२०२४