मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन

109

#indiandastak#onlinenewsnetwork#social#political#crime#accident#

प्रतिनिधी//

मुंबई, दि. २० :- मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना त्यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विनम्र अभिवादन केले.

‘वर्षा’ शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी आद्य पत्रकार दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी उपस्थित मान्यवर, अधिकारी, कर्मचारी आदींनीही जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.