अखिल भारतीय आदिवासी विकास युवा परिषद गडचिरोली
गडचिरोली:- मौजा अंगारा पोस्ट अंगारा तालुका कुरखेडा येथील प्राथमिक आरोग्य पथक येथे डॉक्टर उपलब्ध करून देण्यात यावे या मागणीचे अखिल भारतीय आदिवासी विकास युवा परिषद,गडचिरोली यांचे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
मौजा अंगारा येथील गेल्या दोन महिन्यापूर्वी प्राथमिक आरोग्य पथक येथे कार्यरत असलेल्या डॉ. प्रज्ञा हेमके, एमबीबीएस ह्यांनी आपल्या पुढील शिक्षण पुर्ण करण्याकरिता पदाचा राजीनामा दिल्या आहेत.
व या पदावर दोन महिन्यांपासुन आजतागायत डॉक्टर अजूनपर्यंत उपलब्ध झालेले नाही.याचा फटका सर्वाधिक सामान्य नागरिकांना बसलेला असुन रुग्णालयातील आरोग्य सेवा देखील रुग्णांना मिळणे कठीण झाले आहे तरी मौजा अंगारा येथील प्राथमिक आरोग्य पथक येथे तात्काळ डॉक्टर उपलब्ध करून देण्यात यावे अशी मागणी अखिल भारतीय आदिवासी विकास युवा परिषद गडचिरोलीच्या वतीने जिल्हाधिकारी गडचिरोली यांच्याकडे करण्यात आली.
यावेळी उपस्थित अखिल भारतीय आदिवासी विकास युवा परिषद गडचिरोली जिल्हाध्यक्ष कुणाल कोवे,प्रेमचंद चिकराम रा. अंगारा यांच्यासह गावातील नागरिक उपस्थित होते.