माजी पालकमंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांनी नागेपल्ली येथील श्रीनिवास सिलमवार यांच्या कुटंबीयांना घरी भेट देऊन केली सांत्वना

283

नागेपल्ली येथील श्रीनिवास सिलमवार हे पेरमिली येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.त्यांना दोन मुली व एक मुलगा होता.श्रीनिवास सिलमवार यांच्या मुलगा दिपक सिलमवार वय वर्ष 32 होते.दिपक हा मागील काही वर्षांपासून स्पर्धा परीक्षा देत होता. पण 2,3 गुणाने परीक्षेत यश मिळत नव्हतं या वर्षीचा दिपक चा शेवटची संधी उरलेली होती मात्र दिपक परीक्षेकरीता अथक परिश्रम घेतले होते मात्र शेवटच्या परीक्षेत मात्र दिपकला पुन्हा अपयश हाती आले. दीपक हा या अपयशाला पचवू शकला नाही. परीक्षेच्या निकाल लागल्यानंतर दिपक हा दोन तीन दिवसापासून डिप्रेशन मद्ये होता. घरी कोणी नसल्याचा संधी साधून घरातील बाथरूम च्या वरील रॉड ला दोरी बांधून स्वतःच्या गड्याला फासी लावून आयुष्यातील परीक्षेत संपवली. परीक्षेपासून च नवे तर आयुष्यापासून विराम दिले. दिपकच्या आत्महत्या हे त्यांचा आई वडिलांना हादरून टाकले. श्रीनिवास सिलमवार यांना वृद्धापकाळात दीपक हा एकच मुलगा सहारा होता पण तोच काहीही विचार न करता टोकाची भूमिका घेतली आणि स्वतःला कुटुंबापासून दूर केले.
ही माहिती माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांना माहिती मिळताच नागेपल्ली येथील त्यांचा घरी जाऊन सांत्वना भेट दिले.

यावेळी भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते!