9 जानेवारी रोजी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत महिला सशक्तीकरण अभियान

136

गडचिरोली,(जिमाका)दि.08 : 9 जानेवारी 2024 रोजी मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाची सुरुवात गडचिरोली येथे होत आहे. या अभियानाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उपस्थिती राहणार आहे. मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान कार्यक्रमाची सुरुवात सकाळी 11.00 वा. एमआयडीसी मैदान, कोटगल रोड, गडचिरोली येथे होत आहे.
यावेळी अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम, उद्योग मंत्री उदय सामंत, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची प्रामुख्याने उपस्थिती राहणार आहे.
यावेळी विविध विकास कामांचे भुमिपुजन मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.