हेडरी येथील धान खरेदी केंद्रात १३ हजार पोती धान कमी सचिव वर होणार फौजदारी कारवाई

175

सचिव वर होणार फौजदारी कारवाई

एटापल्ली – मागील हंगाम २०२२-२३ मध्ये हेडरी येथील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्या मार्फत खरेदी केलेल्या धाना पैकी तब्बर १३ हजार पोती धान कमी निघाल्यांने या संस्थेचे सचिव किशोर पदा यांच्यावर फौजदारी कारवाई होण्याचे संकेत उप. प्रादेशीक व्यवस्थापक ( उच्च श्रेणी ) अहेरी बि. एस. बरकमकर यांनी दिले.
मागील हंगामात संस्थेमार्फत १०,५८८४ पोती,( ४२,३५३.४० किंन्टल) धान खरेदी केली. या धानाची उचल उप. प्रा. व्यवस्थापक कार्यालय अहेरी मार्फत टेंडर अंतर्गत राईस मिल धारक करतात. ३१ डिसे पर्यत सर्व धानाची उचल करायची असते. राईस मिल धारकांचे ट्रक धान उचल करण्यास गेले असता. हेडरी येथील आ.वि.का.सह.संस्था मर्या सचिव किशोर पदा यांनी धान पोती देण्यास टाळाटाळ करीत असल्यांची तक्रार राईस मिल धारकाकडुन उप. प्रादे. व्यवस्थापक अहेरी यांना केली.
सदर तक्रारीची दखल घेवुन उप. प्रा. व्यवस्थापक यांनी हेडरी येते जावुन चौकशी केले असता. खरेदी धाना पैकी १२,९९८ पोती ( ६७०० किंन्टल ) धान कमी निघाले. धानाची अफरा तफर प्रकरणी संस्थेचे सचिव किशोर पदा यांच्यावर फौजदारीचे संकेत बरकमकर यांनी दिले.

या प्रकरणी संस्थेच्या सचिवाना नोटीस देवुन विचारना केली. व चौकशी केली असता. धान कमी आढळले, चौकशी अहवाल उप. प्रा. व्यवस्थापक आयुक्त नागपुर यांना पाठविले आहे, त्यांच्या आदेशानुसार सस्थेच्या सचिवावर पुढील कारवाई केली जाईल.
बि. एस. बरकमकर
उप.प्रा.व्यवस्थापक (उच्च श्रेणी) अहेरी