राजाराम चे पोलिसांनी दिले आदिवासी मुलांना फिल्टर R/O लावून पिण्याचे पाणी

156

दि. 2 जानेवारी 1961 रोजी महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना झाली.सदर दिनाचे औचित्य साधून उप पोलीस स्टेशन राजाराम खा येथे दि.02/01/2024 ते 08/01/2024 या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहेत.
आज दि. 05/01/2024 रोजी उप पोलीस स्टेशन राजाराम खा. येथे 11:00 ते 12:00 वाजता भगवंतराव आश्रम शाळा राजाराम येथील विद्यार्थी व विद्यार्थिनी यांना पिण्याच्या पाण्याची समस्या असल्याचे शाळेतील शिक्षक वर्गानी उप पोलिस स्टेशन येथे समस्याबाबत कळविले या समस्या बाबत अधिकारी व अमलदार समस्याची गंभीरता पाहून विचार करून आपल्या सहखिशातून निधी गोळा करून आश्रम शाळेतील आदिवासी मुला- मुलींचे आरोग्याचे विचार करून नवीन फिल्टर मशीन बसवून देण्याचे ठरविले व आज रोजी R/O मशीनचे उदघाटन करून मुलांना असलेल्या समस्याचे निराकरण करून देण्यात आले. सदर कार्यक्रमाला चे अध्यक्ष मा.पोउपनि वाकळे सा. SRPF गट क्र.1 पुणे हे होते. प्रमुख पाहुणे उप पोलिस स्टेशन राजाराम खा चे प्रभारी अधिकारी मा.पोउपनी साहेबराव कसबेवाड सा., मा.पोउपनी सचिन चौधरी सा. पोउपनी जाधव सा.
शाळेचे मा.मुख्याध्यापक बासनवर सर, मा. मेश्राम सर, मा. ओडनालवार सर तसेच शाळेतील सर्व शिक्षकवृंद व जिल्हा पोलिस SRPF सर्व अमलदार उपस्थित होते.
सदर कार्यक्रमासाठी भगवंतराव आश्रम शाळेतील 420 शालेय विद्यार्थी उपस्थित होते.