डी.बी.ए. पब्लिक स्कूल,अहेरी च्या वार्षिक समारंभ व आंतरशालेय क्रीडा स्पर्धेला जोरदार सुरुवात

184

 

  1. भगवंतराव शिक्षण मेमोरियल संस्थेच्या डी.बी.ए.पब्लिक स्कूलच्या वार्षिक समारंभ व आंतरशालेय क्रीडा स्पर्धेला आज दिनांक 14 डिसेंबर 2023 रोजी भगवंतराव शिक्षण मेमोरियल संस्थेच्या माजी अध्यक्षा *स्व.स्नेहादेवी धर्मरावबाबा आत्राम* यांच्या जयंतीच्या औचित्याने विद्यार्थ्यांच्या शांतीचे प्रतीक घेऊन मशाल मार्चने सुरुवात झाली.या वार्षिक समारंभ व आंतरशालेय क्रीडा स्पर्धेचे उदघाटन भगवंतराव शिक्षण मेमोरियल संस्थेच्या अध्यक्षा तथा माजी जि.प.अध्यक्षा *मा.भाग्यश्रीताई आत्राम* यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून डी.बी.ए. पब्लिक स्कूलच्या संस्थापिका तथा सिनेट सदस्या,गोंडवाना युनिव्हर्सिटी गडचिरोली *मा.तनुश्रीताई आत्राम*,मुख्य अतिथी मा.एम.रमेश IPS,अतिरिक्त एसपी प्राणहिता,PI अहेरी मनोज आंधे,धनंजय कांबळे पंचायत समिती सदस्य, मा.किष्किंदरावबाबा आत्राम,रामेश्वररावबाबा आत्राम,नारायणरावबाबा आत्राम,पत्रकार सुरेंद्र अलोने,इंदुताई मडावी,शाळेचे मुख्याध्यापक संतोष बेझंकीवार सर उपस्थित होते.यावेळी मा.भाग्यश्रीताई आणि मा.तनुश्रीताई यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केले आणि अधिक चांगल्या खेळासाठी क्रीडाप्रेमींना शुभेच्छा दिल्या.या स्पर्धेचे आयोजन 14 – 23 डिसेंबर या दरम्यान करण्यात आले आहे.