आलापल्ली येथे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांचा वाढदिवशी राजे अम्ब्रिशराव महाराज यांनी प्रायोजित केलेला “PM skill for run” संपन्न, स्पर्धकांचा उस्फुर्त प्रतिसाद #jantechaawaaz#news#portal#

49
प्रतिनिधी//
आलापल्ली येथिल शासकीय औ. प्र. संस्था ITI येथे मा. पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त *“PM Skill for Run”* ह्या मॅरेथॉन स्पर्धेचे काल आयोजन करण्यात आले होते, ह्या स्पर्धला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला, ह्या स्पर्धेला माजी पालकमंत्री मा.राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी प्रायोजित केले होते, त्यांचेकडुन स्पर्धकांना २५० टीशर्ट, ग्लुकोस पाणी, अल्पोपहार इत्यादीची व्यवस्था करण्यात आली  होती.













शासकीय औ प्र संस्था आलापल्ली येथील मॅरेथॉन स्पर्धा मा. प्र. प्राचार्य श्री वैभव बोनगीरवार यांच्या मार्गदर्शनाखाली व श्री डी. एच. चव्हाण प्रभारी गटनिदेशक यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झाली,












स्पर्धेचे उदघाटन मा श्री काळबांडे सर PI अहेरी यांच्या द्वारे करण्यात आले, तसेच प्रमुख पाहुणे म्हणून श्री व्ही बी चव्हाण API अहेरी, सरपंच आलापल्ली, श्री सागर बिट्टीवार सामाजिक कार्यकर्ते, व इतर मान्यवर उपस्थित होते स्पर्धेमध्ये २३० स्पर्धकांनी भाग घेतले होते.

*विजेते उमेदवार*

शासन वतीने पुरस्कार

पुरुष गट

०१. राकेश चौधरी (प्रथम ३००० रुपये)
०२. रमेश तलांडे (द्वितीय २००० रुपये)
०३. अजय चलाख (तृतीय १००० रुपये)

महिला गट
०१. प्रतिभा आलाम (प्रथम ३००० रुपये)
०२. अंकिता गावडे (द्वितीय २००० रुपये)
०३. भूमिका डांगे (तृतीय १००० रुपये)

*प्रोत्साहन पुरस्कार*
०१. अंकिता अनिल मडावी १० वर्ष
०२. निकिता अनिल मडावी १२ वर्ष
वयानुसार त्यांना सहभाग घेता येत नव्हते परंतु त्यांनी स्वतःच्या जबाबदारीवर धावून पहिला व दुसरा क्रमांक पटकाविला परंतु त्या दोघीना शासन नियम नुसार पुरस्कार देता आले नाही, म्हणून
१. मा, राजे अम्ब्रिशराव महाराज यांचे कडून प्रत्येकी ११०० रुपये
२. १००० रुपये प्रत्येकी P.I. कालबांधे साहेबांकडून
३. ५०० रुपये प्रत्येकी API चव्हाण साहेबांकडून
४. ५०० रुपये प्रत्येकी मा. वैभव बोनगीरवर प्र. प्राचार्य
यांचेकडून र्प्रोत्साहन पुरस्कार देण्यात आले

सहकार्य करण्याऱ्या कर्मचारीचे नाव
श्री एस एल गावंडे
श्री व्ही एस तुमसरे
श्री पी ए धुळसे
व इतर सर्व तासिका निदेशक वर्ग तसेच सर्व चतुर्थ श्रेणी कर्मचारी, सफाईकामगार व सुरक्षा रक्षक व प्रशिक्षणार्थी समिती नी पार पडली.!! 👇