अखंड तारकब्रम्ह नाम संकीर्तन तथा रासलीला उत्सवाला भाग्यश्री ताई आत्राम यांची उपस्थिती

54

 

मुलचेरा:- श्री राधाकृष्ण सार्वजनिक भजन मंदिर,सुंदरनगर द्वारा आयोजित अखंड तारकब्रम्ह नाम संकीर्तन तथा रासलीला उत्सवाला भाग्यश्री ताई आत्राम यांची उपस्थिती दर्शविली.

मुलचेरा तालुक्यात बंगाली बांधव मोठ्या संख्येने वास्तव्यास असून याठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहाने साजरा करतात. तालुक्यातील सुंदरनगर येथे राधाकृष्ण सार्वजनिक भजन मंदिर,सुंदरनगर द्वारा आयोजित अखंड तारकब्रम्ह नाम संकीर्तन तथा रासलीला उत्सव साजरा करण्यात येत आहे.या कार्यक्रमाला माजी जि.प.अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्री ताई आत्राम यांनी २८ नोव्हेंबर रोजी उपस्थीती दर्शवून संकीर्तन व रासलीला चा आस्वाद घेत दर्शन घेतले.

यावेळी श्री श्री राधाकृष्ण सार्वजनिक भजन कमिटी तर्फे ताईंचे पुष्पगच्छ देऊन स्वागत करण्यात आले.यावेळी ताईंनी कमिटी तर्फे आयोजित कार्यक्रमाची माहिती घेत संवाद साधले तसेच या धार्मिक कार्यक्रमाची प्रशंसा केली.यावेळी भाग्यश्री ताई आत्राम यांच्यासोबत सोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते, कमेटीचे सदस्य तसेच भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.