आलापल्ली ते अहेरी रोड बांधकामात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषींवर कडक कार्यवाही करावी #jantechaawaaz#news#portal#

55
प्रतिनिधी//

आलापल्ली: संबंधित अधिकारी यांना निलंबित करावे व, कंत्राटदार यांना काळया यादीत टाकावे .या रोडचे दयननिय अवस्थेमुळे, चूक नसताना अनेक लोकांचे नाहक जीव गेले , पाठीच्या मणक्याचे त्रास सुरू झाले , गरोदर मातांना वेदना सहन कराव्या लागतात , शासकीय कर्मचारी , ज्येष्ठ नागरिक , शाळकरी मुलं मुली इत्यादींना प्रचंड मनस्ताप सहन करावे लागत आहे















धुळीच्या त्रास वाढल्यामुळे अनेक लोक बिमार पडत आहेत …या सर्वांसाठी जबाबदार असणारे  अधिकारी , कंत्राटदार यांना मात्र वातानुकूलित ऑफिस आणि चार चाकी वाहन असल्यामुळे कदाचित त्यांना या अडचणींची जाणीव नसेल . परंतु आता सदर कामाच्या निकृष्ट दर्जाबाबत व भ्रष्टाचाराबाबत अधिकारी व कंत्राटदार यांचेवर आरोप निश्चित होणे अतिशय आवश्यक आहे . 




















करिता अश्या कामचुकार व भ्रष्टाचारी अधिकारी यांचेवर कडक सस्वरूपाच्या कार्यवाहीची मागणी व जबाबदारी निश्चित करण्यासाठी व यातून लोकांची अडचण जाणून जनकल्याण समाज उन्नती अन्याय भ्रष्टाचार निवारण समितीचे गडचिरोली अध्यक्ष श्री संतोष ताटीकोडावर यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग आलापल्ली






















 कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.यावेळी विपूल खोब्रागडे , शंकर धोलगे ,दीपक चालुरकर,अंवर शेख,जमीर शेख,आझाद भांडेकर,अक्षय कोलपकवार,राजेंद्र साळवे,मुकेश ,विनोद भाऊ वकणपल्लिवर भाजपा तालुका उपाध्यक्ष, वाकुडकर जिल्हा उपाध्यक्ष मनसे. उपस्थित होते 




















प्रमुख मागण्या 
१) 65 लाखांच्या ए एम सी कामाची चौकशी करून दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करावे तसेच दंडात्मक कार्यवाही करावी 


















२) दुरुस्तीचे काम सुरू असताना त्याच रस्त्यावर दुसरे कंत्राट कसे काय काढले 






















३) आलापल्ली ते अहेरी रस्त्यावरील झालेल्या अपघातात अनेक लोकांचा मृत्यू होत आहे , हात पाय तुटत आहेत याला यासाठी जबाबदारी निश्चित होणे आवश्यक आहे 






















४) रस्ता बांधकामाचे काम तात्काळ करण्यात यावे .