गडचिरोली:-राज्यातील खऱ्या आदिवासींच्या आरक्षण सूचीत धनदांडग्या गैरआदिवासी धनगर जातीचा असंवैधानिकरित्या समावेश करण्यात येऊ नये, तत्कालिन राज्य सरकारने टाटा इन्स्टीट्यूट ऑफ सोशल सायन्सेसमार्फत केलेले धनगर समाजाचे सर्वेक्षण उच्च न्यायालयात सादर करुन तो अहवाल जनतेसाठी खुला करावा, अनुसूचित जमातीच्या खोट्या जात प्रमाणपत्राच्या आधारे शासकीय नोकऱ्या बळकावलेल्या व जात वैधता प्रमाणपत्र सादर न केलेल्या गैरआदिवासींवर फौजदारी गुन्हे दाखल करावे या प्रमुख मागण्यांसाठी आदिवासी बचाव कृती समिती व सहयोगी विविध आदिवासी संघटनांच्या वतीने आज गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयावर महाआक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी अखिल भारतीय आदिवासी विकास युवा परिषद, मुलचेरा तालुका अध्यक्ष सतिश पोरतेट,वासुदेव मडावी,शैलेश वेलादी,अविनाश सडमेक,संदिप तोरे,हनुमंत मडावी,हर्षद आलाम,जमनादास आलाम,मघुकर वेलादी,देवीदास पोरतेट,मलेश तंलाडे,कार्तीक मडावी यांच्यासह संघटनेचे ईतर कार्यकर्ते व अहेरी विधानसभा क्षेत्रातील आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.






