या बत्तकम्मा उत्सवाने राजाराम येथील झाले भक्तीमय वातावरण
राजाराम :अहेरी तालुक्यातील राजाराम येथे बत्तकम्मा हा सण मोठ्या उत्साहात गावोगावी साजरा केला जातो. तेलंगणा राज्याची संस्कृती असलेला बत्तकम्मा अहेरी तालुकातील महिला भक्तांकडून मोठ्या उत्साहाने साजरा केला जात आहे. महिला भक्त या बत्तकम्मात नऊ दिवस पूजा करतात. दसऱ्याच्या दिवशी व सणाच्या आदल्या दिवशी या बत्तकम्माचं विसर्जन केलं जातं. बत्तकम्मा देवी हा एक गौरीसारखा प्रकार आहे. वेगवेगळ्या फुलांनी व पाने तयार केलेल्या बत्तकम्माची नऊ दिवस महिला भक्त भक्तिभावाने पूजा करतात.
नदीत या तलावात केलं जातं विसर्जन
तालुक्यातील सिरोंचा राजाराम रायगट्टा गुडीगुड्डम निमलगुडम अहेरी तालुक्यात महिला भक्त उत्साहाने हा सण साजरा करतात. प्रत्येक आपल्या गावात आणि शहरात हे बत्तकमा एक ठिकाणी ठेवतात. सर्व महिला भक्त दोन ते तीन तास त्यांची पूजा करतात. नंतर या बत्तकम्मा डोक्यावर घेऊन पायदळ प्रवास करतात. नदीत या तलावात बत्तकम्मा विसर्जन केलं जातं.
मोठ्या भक्तिभावाने बत्तकम्माचा महिला भक्तांकडून साजरा केला गेला जात आहे बत्तकम्मा गौरीचा प्रकार आहे. तेलंगणा राज्याची संस्कृती असलेला हा सण आहे. आम्ही आमच्या गावात साजरा करतो, असं अहेरी तालुक्यातील राजाराम येथील महिलांनी सांगितलं.
अहेरी तालुक्यातील तेलगु समाज बांधवांनी बत्तकम्मा सण उत्साहात साजरा केला जात आहे. गौरीच्या प्रथेप्रमाणे सजवलेले घट व शेकडो दीप सोबत घेत हा उत्सव साजरा करतात. आपल्या परिवाराच्या समृद्धीसाठी व भरभराटीसाठी माता गौरीकडं प्रार्थना केली जाते.
अहेरी तालुक्यातील राजाराम येथे मोठ्या संख्येने तेलगु भाषिक वास्तव्याला आहे. एका मोठ्या मैदानात बत्तकम्मा महोत्सवाचे आयोजन करून यात सर्वांना सहभागी करून घेतात
याप्रसंगी मंडपाच्या मधोमध आकर्षक फुलांनी सजविलेले घट आणि त्याभोवती फेर धरून नाचणाऱ्या महिला यामुळे राजाराम येथील वातावरण भक्तिमय झाले. शेकडो महिला-मुली व तेलगू भाषिक नागरिकांनी बत्तकम्मा महोत्सवात दररोज उत्साही सहभाग घेत आहेत.






