राजे अम्ब्रीशराव महाराज यांच्याकडुन कोनम कुटुंबाला आर्थिक मदत…

192

.

 

सिरोंचा.. तालुक्यातील ग्राम पंचायत रंगधामपेठा येथील भाजपा कार्यकर्ता श्री. डॉ.लक्ष्मीनारायण कोनम यांच्या पत्नीची 17-10-2023 रोजी रंगधामपेठा येथे दिर्घआजाराने दू,:खद निधन झाले…

विशेष म्हणजे त्यांचा जनकटा मुलगा रामेश्वर (वय १९) याचा रविवारी 8-10-2023 सायंकाळी कालेश्वर येथे गोदावरी नदीच्या पात्रात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला…त्या दुःखातून सावरत नाही तोच पत्नीलाही मृत्यूने ओळवल्यामुळे त्यांच्यावर आघात झाला आहे…
या विषयाची माहिती मिळताच माननीय श्रीमंत राजे अम्ब्रीशराव महाराज यांनी आर्थिक मदत आपल्या कार्यकर्त्यांद्वारे पोहोचविली हयावेळी शंकरभाऊ नरहरी, चंद्रय्या सदनपु, श्रीनाथ राऊत, माधव कासर्लावार सीतापती गट्टू, मुरलीधर रच्चावार, श्रीनिवास कोठारी, संजीव जोडे, श्रीनिवास चौधरी,हरिष कोत्तावड्ला, मनोज मोलगुरी, पार्वतालु देनाबोईना,महेश कारकरी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते..

तालुका प्रतिनीधी सिरोंचा
राजमोगली एम दुर्गम