गुड्डीगुडम येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती

45

रमेश बामनकर 
गुड्डीगुडम :- अहेरी तालुक्यातील गुड्डीगुडम येथे ग्राम पंचायत कार्यालय, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, शासकीय माध्य. आश्रम शाळा, निमलगुडम येथील शाळेत राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांची १५२ वी जयंती.करण्यात आले.
  महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला दीपप्रज्वलन करून पुष्पहार अर्पण करून विधिवत पूजा अर्चा करण्यात आले या प्रसंगी उपस्थित पदाधिकारी यांनी महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जिवनचारितत्र्यावर मनोगत व्यक्त केले. या वेळी गुड्डीगुडम येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले.सदर कार्यक्रमात सरपंच सरोजा पेंदाम, उपसरपंच प्रफुल नागूलवार, ग्राम सेवक एस.एस. सडमेक, शिक्षक वि. जे. आत्राम,के. एम. कोंडागुर्ले, अंगणवाडी सेविका मीना मडावी, ग्रामपंचायत सदस्य घननिळा ओंनपाकाला,जयश्री आत्राम,श्रीकांत पेंदाम माजी ग्रा. प. सदस्य रवींद्र मडावी,सामाजिक कार्यकर्ते अनिल पेंदाम पैसा अध्यक्ष अच्युतराव सिडाम, संगणक चालक तिरुपती डोंगरे, सीपाई श्रीनिवास आईलवार, शाळा समितीचे अध्यक्ष सतीश आत्राम, उपाध्यक्ष चिरंजीव पल्ले, निमलगुडम शाळा समिती अध्यक्ष रमेश बामनकर, उपाध्यक्ष अशोक कोडापे व शालेय विद्यार्थी आणि आदी नागरिक उपस्थित होते.