प्रज्ञा, शील आणि करुणा हाच धम्माचा मूलाधार – लक्ष्मण रत्नम*

45

नागसेन बुद्ध विहार, आल्लापल्ली येथे 66 वी अशोका विजयादशमी मोठ्या उत्साहात पार पडली. विहाराचे अध्यक्ष आयु. चंद्रप्रकाश कोरडे  यांनी धम्म ध्वजारोहण केले. त्यांच्याच अध्यक्षतेखाली विजयादशमीचा सोहळा शेकडो उपासक आणि उपासिकांच्या उपस्थिती
पाडण्यात आले.
       याप्रसंगी शिक्षक आयु. लक्ष्मण रत्नम यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना असे म्हणाले, की ज्याला त्याला आपला धर्म  प्रिय असतोच. मात्र त्या धर्मातील तत्त्वे अंगिकारून तसे आचरण केल्या जात नाही. प्रत्येक धर्म हा मानव कल्याणासाठी तत्पर असावा. आपला धर्म जोपासत असतांना इतर धर्मियांच्या भावना दुखावल्या जाणार नाही याचे भान ठेवावे. प्रज्ञा, शील आणि करुणा हाच धम्माचा मूलाधार आहे. असे लक्ष्मण रत्नम यांनी म्हणाले.
     कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयु. प्रा. सुरेंद्र तावाडे यांनी तर आभार प्रदर्शन आयु. शैलेश राऊत यांनी पार पाडले.