1 वर्षापासून ची अडचण झाली दूर, दिवाळी ला मिळणार धान्य

43

मरपल्ली: पोमके मरपल्ली हद्दीतील करंचा व दत्तक गांव भस्वापूर येथील नागरीकांनी त्यांचे कडे मागील 1 वर्षीपासून रेशनकार्ड असुन सुद्धा रेशन/धान्य मिळत नसल्याची आमच्या कडे तक्रार मांडली होती.. तरी संबंधित दोन्ही गावातील असे एकूण 13 रेशनकार्ड आढळून आले.. तरी आम्ही सदर बाबतीत श्रीमती. दरेकर मॅडम, पुरवठा निरीक्षक, तहसील कार्यालय, अहेरी यांचेशी संपर्क नागरीकांची अडचण मांडली.. व कागदपत्रांची पुर्तता करून रेशनकार्ड तहसील कार्यालय, अहेरी येथे पाठवले.. तरी रेशनकार्ड वर धान्य मिळण्याकरिता लागणाऱ्या तांत्रिक बाबींची पुर्तता करून सदर 13 रेशनकार्ड आज रोजी प्राप्त होवून संबंधित नागरीकांना वाटप करण्यात आले.. तरी संबंधित नागरीकांना दिवाळीच्या सणाला रेशनकार्ड नुसार धान्य उपलब्ध होणार आहे.. तरी प्रभारी अधिकारी संतोष जायभाये यांनी श्रीमती दरेकर मॅडम, पुरवठा निरीक्षक, अहेरी यांचे आभार मानले..