शेतातून गेलेल्या विद्यूत पोलची मोबदला मिळवून द्या नुकसानग्रस्त शेतक यांनी माजी आमदार दिपक आत्राम यांचेसमोर मांडले गाऱ्हाणे*

43

मुलचेरा तालुक्यातील शांतीग्राम व तुमरगुंडा व कोलपल्ली येथील शेतकर्‍या सन 2019-2022 या वर्षात महावितरण विभागाच्या वतीने शेतातून विद्यूत टॉवर पोल बसविण्यात आले. यामुळे झालेल्या पीक नुकसानीसह जमिनीच्या मोबदला प्रशासनाकडून संबंधित शेतक-यांना अद्यापपर्यंत देण्यात आलेले नाही. यामुळे शांतीग्राम, तुमरगुंडा व कोलपल्ली हद्दीतील नुकसानग्रस्त शेतक-यांनी माजी आ. दिपक आत्राम यांचेसमोर गा-हाणे मांडित पीक नुकसान भरपाई व जमिनीचा मोबदला मिळवून देण्याची विनंती निवेदनातून केली.
संबंधित शेतक-यांनी दिपक आत्राम यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सन 2017-18 या वर्षात विद्यूत विभागाच्या वतीने आमच्या शेतात विद्यूत पोल (टॉवर) बसविले होते. त्या वर्षीच्या पीक नुकसानीची भरपाई संबंधित प्रशासनाच्या वतीने शेतक-यांना देण्यात आली. मात्र त्यानंतर 2019 ते 2022 या कालावधीतील पीक नुकसान व टॉवर लावलेल्या जमिनीच्या मोबदला संबंधित शेतक-यांना अद्यापपर्यंत मिळालेला नाही. त्यामुळे आम्हा शेतक-यांवर मोठा अन्याय झाला असून सदर प्रकरणाची आपल्या स्तरावरुन सखोल चौकशी करुन आम्हा शेतक-यांना मोबदला मिळवून द्यावा, अशी विनंती निवेदनातून केली. यावेळी माजी आ. दिपक आत्राम यांनी अन्यायग्रस्त शेतक-यांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन देत संबंधित प्रशासनाकडून मोबदला मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याची हमी दिली. यावेळी निवेदन सादर करताना रबिन बाला, खितीश बिश्वास, नारायण मिस्त्री, सिद्धेश्वर बिश्वास, जीवन रॉय, नारायण नाथ, रवी बिश्वास, नामदेव कुसनाके, नंदाबाई सेडमाके, विलास चौधरी, नकटू चौधरी, अमसा चौधरी, हनमंतू चौधरी आदींसह कोलपल्ली, तुमरगुंडा, शांतिग्राम हद्दीतील अन्यायग्रस्त शेतकरी उपस्थित होते.