मुख्यमंत्री झाल्या नंतर एकनाथ शिंदे यांचा प्रथमतः दौरा
गोसिखुर्द प्रकल्प 2025 पर्यंत पूर्णत्वास नेणार असल्याची गाव्ही ।
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज भंडारा जिल्ह्याचा दौऱ्यावर होते सकाळी गोसिखुर्द प्रकल्प पाहणी नंतर त्यांनी आढावा बैठक घेत भंडारा शहरात तब्बल 200 कोटी रुपयांचा विविध कामांचे भूमिपूजन केले । तर या विविध कार्यक्रम नंतर भंडारा येथे त्यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती विशेष म्हणजे भंडारा जिल्ह्यात झालेली अतिवृष्टी तसेच धानाला बोनस जाहीर होणार काय या कडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले होते तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अवकाळी पाऊस तसेच अतिवृष्टी मुळे बाधित शेतकऱ्यांना आतापर्यंत तब्बल 60 कोटी दिले असल्याचे सांगितले शिवाय धान उत्पादक शेतकाऱ्याला बोनस प्राप्त व्हावा या करिता उपसमिती नेमली असून त्याचा अवहाल आल्या नंतर या शेतकऱ्यांचा प्रश्न मिटणार असल्याचे सांगितले तसेच गोसिखुर्द महत्वकांक्षी प्रकल्प अंतर्गत तब्बल अडीच लाख हेक्टर जमीन सिंचन खाली येणार असून येत्या 2025 पर्यंत पूर्णत्वास येणार आहे शिवाय उद्योग व पर्यटन ला चालना देण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले । तर विरोधकांवर उत्तर देत एकनाथ शिंदे हे 50 खोके देत नसून 200 खोके हे विकास काम करिता देतात असे देखील त्यांनी आपल्या भाषणातून ते बोलले तर या सभेला भंडारा जिल्ह्यातून मोठ्या संख्येत नागरिक उपस्थित होते ।







