भारतीय जनता पार्टी चा डंका, वांगेतुरी ग्रामपंचायत सरपंच व उपसरपंच निवडणुकीत मा. राजे अम्ब्रिशराव महाराज माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री गडचिरोली जिल्हा यांच्या समर्थकांचा बिनविरोध निवड,

71

*ग्रामपंचायत वांगेतुरी*
येथे दि 21/05/2026 रोजी गुरुवारी दुपारी झालेल्या सदस्य निवडणुकीत सरपंच, उपसरपंच यांना सर्व सदस्यांनी बिनविरोध निवड केलेली आहे,

सरपंच म्हणुन सौ. वनिता गोमजी कोवासी, उपसरपंच म्हणुन सौ. शैला रामसु कोवासी, सदस्य श्री गणेश कोरसा, श्री सुरेश कोवासे,सौ अनिता मठ्ठामी,हजर होते,

भारतीय जनता पार्टी गडचिरोली तर्फे श्री प्रशांत भाऊ आत्राम जिल्हा महामंत्री भाजपा (आ.आ.) गडचिरोली यांनी निवडुन आलेल्या पदाधिकारी व सदस्य यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार व मार्गदर्शन करण्यात आला असुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत,

सोबत श्री रैजु गावडे गाव पाटील तोडसा,श्री मिरवा गावडे पेरमा तोडसा, श्री दादाराव राजुरकर पाटणबोरी (गवारा), श्री विकास तोडसाम तालुकाध्यक्ष अहेरी, श्री श्रीनिवास मगडीवार, कु मनीष ढाली, कु आविष्कार गड्डमवार,कु शुभम आत्राम,अजय ठाकरे,श्री पत्तु पोटावी ग्रामसभा अध्यक्ष, श्री किशोर कोवासी गाव पाटील, श्री धर्मा कोरसा, श्री बुच्छा कोरसा, श्री मानसिंग मठ्ठामी, श्री शंकर कोवासे, व गट ग्रामपंचायत वांगेतुरी येथील डोड्डुर, पुस्कोटी, रेंगाटोला,तोडगट्टा,
हिंदुर,बोदील टोला,या गावातील नागरिक व भारतीय जनता पार्टी एटापल्ली चे जिल्हा व तालुका पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते,