भारत जोडण्यासाठी कोल्हापूरकर चालले.

75

काँग्रेस पक्षाचे नेते आदरणीय राहुल जी गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत आज आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातील दहा हजाराहून अधिक कार्यकर्ते सामील झाले. अपार उत्साहाने भारलेल्या वातावरणात आज सकाळच्या सत्रातील हिंगोली जिल्ह्यातील प्रवासाचा टप्पा पार पडला.
नफरत छोडो, भारत जोडो या संकल्पनेतून सुरू असणाऱ्या या यात्रेत कोल्हापूर जिल्ह्याचा समतेचा, पुरोगामीत्वाचा वसा घेऊन समस्त काँग्रेस कार्यकर्ते सामील झाले. यावेळी कोल्हापूर चा वारसा अभिमानाने मिरवणारे कोल्हापुरी फेटे सर्वांनी परिधान केले होते. कोल्हापुरी संस्कृतीचे मानचिन्ह असणाऱ्या कुस्तीचा खेळ, लेझीम आदींचे प्रात्यक्षिक ही या यात्रेत दाखवण्यात आले. स्वतः राहुलजींनी सुरक्षा कडे बाजूला सारत कुस्तीचा खेळ पाहिला. भारत जोडो यात्रेचा परिसर यावेळी चैतन्याने भारलेला होता. आजच्या या यात्रेत राहुलजीनी कोल्हापूरमधून आलेले कार्यकर्ते आणि युवक – युवती,युवक काँग्रेसचे पदाधिकारी यांची आस्थेवाईकपणे चौकशी करून त्यांच्यासोबत फोटोसुद्धा काढले. यामुळे हे सर्वजण भारावून गेले.

यावेळी आ.जयंत आसगावकर, आ.ऋतुराज पाटील ,आ. राजूबाबा आवळे, राहुल पाटील यांच्यासह कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेस ,युवक काँग्रेस आणि सर्व सेलचे पदाधिकारी आणि काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.
राहुलजींच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन शेकडो किलोमीटरचा प्रवास करून या यात्रेत अत्यंत उत्साहाने सामील झालेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांचे, समविचारी व्यक्तींचे मी कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचा अध्यक्ष या नात्याने मनापासून आभार मानतो.